हिवाळ्यात या ट्रीक्सने घर ठेवा उबदार, थंडी मिनिटात जाईल पळून
हिवाळ्यात रात्रीच्या वेळी घर उबदार ठेवण्यासाठी खिडक्या व्यवस्थित बंद करणे, जाड पडद्यांचा वापर करणे आणि फरशांवर रग्स पसरवणे महत्त्वाचे आहे. अधिक थंडी असल्यास सुरक्षितपणे रूम हीटरचा वापर करता येतो.

हिवाळ्यात या ट्रीक्सने घर ठेवा उबदार, थंडी मिनिटात जाईल पळून
हिवाळ्यात रात्रीच्या वेळी घरामध्ये असताना थंडी वाजत असते. यावेळी आपल्याला थंडी वाजू नये म्हणून काय करायला हवं हे समजत नाही. अशावेळी आपण काय करू शकतो तेच समजून घेऊयात.
खिडक्या व्यवस्थित बंद करा
रात्रीच्या थंड हवेमुळे घर पटकन गार होते. खिडक्या, दरवाजे आणि त्यांच्या भोवतीची फटी नीट बंद केल्या तर उबदारपणा टिकून राहतो. आपण घरामध्ये उबदारपणा केल्यास झोप चांगली यायला मदत मिळते.
जाड पडद्यांचा वापर करा
जाड, थर्मल पडदे थंड हवा आत येण्यापासून थोपवतात. दिवसा सूर्यप्रकाश येऊ द्या आणि रात्री पडदे घट्ट लावा. अशाने घरात उब टिकते.
फरशांवर रग्स किंवा कार्पेट
फरशा रात्री खूप थंड होतात. कार्पेट किंवा रग्स पसरल्याने पायांना उब मिळते आणि खोलीचे तापमानही वाढते. त्यामुळं फरशा बसवत असताना त्या थंड तर पडणार नाहीत ना याची काळजी घ्या.
छोटा रूम हीटर
जर खूप थंडी असेल तर हीटर वापरू शकता. पण टायमर, सेफ मोड आणि वेंटिलेशन यांची नक्की काळजी घ्या. छोटा हिटर बसवताना रूम सुरक्षित आहे ना याकडे लक्ष द्यायला हवं.
मेणबत्त्या किंवा लहान दिवे
कधी कधी हलका प्रकाशही खोलीला उबदार वातावरण देतो. सुगंधी मेणबत्त्या तर वातावरण सुखद बनवतात. त्यामुळं रूममध्ये जमलं तर मेणबत्या लावून वातावरण बनवण्याचा नक्की प्रयत्न करा.

