Welcome 2026 : तुम्हाला 2026 ची सुरुवात शांततेत करायची असेल, तर वारवान व्हॅली, मार्गन टॉप आणि चोर नाग तलाव यांसारखी ठिकाणे उत्तम आहेत. ही ठिकाणे गर्दीपासून दूर मन ताजेतवाने करण्याचा, ध्यानाचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनोखा अनुभव देतात.

Welcome 2026 : मावळत्या 2025 वर्षाला निरोप आणि नव्या 2026 वर्षाचे स्वागत करण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. देशभरातील विविध बीच तसेच अन्य पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहे. लहानमोठे रिसॉर्ट, हॉटेल्स, क्लब बुक झाले आहेत. पण या गजबजाटातही शांतता शोधणारे अनेकजण आहेत. ज्यांना नव्या वर्षाचे स्वागत करायचे आहे, पण अत्यंत शांत पद्धतीने. ते पर्यटनासाठी अशीच ठिकाणे निवडतात.

तुम्हाला 2026 ची सुरुवात गर्दी, पार्टी आणि गोंधळापासून दूर करायची असेल, तर भारतात अशी काही फारजणांना माहीत नसलेली ठिकाणे आहेत, जी तुम्हाला शांतता, नीरवता आणि निसर्गाशी एकरूप होण्याची संधी देतात. येथे लांब रांगा नाहीत, ना मोठ्या आवाजात संगीत आहे - फक्त डोंगर, तलाव, थंड हवा आणि स्वतःला भेटण्याची संधी आहे. ही ठिकाणे मन ताजेतवाने करण्यासाठी योग्य आहेत, विशेषतः ज्यांना नवीन वर्षात शांतता आणि स्पष्टता हवी आहे त्यांच्यासाठी.

1. वारवान व्हॅली (Warwan Valley), जम्मू-काश्मीर

वारवान व्हॅली ही काश्मीरमधील सर्वात सुंदर आणि शांत खोऱ्यांपैकी एक आहे. उंच पर्वत, हिरवीगार कुरणे, वाहत्या नद्या आणि छोटी गावे - हे ठिकाण तुम्हाला शहराच्या धावपळीपासून पूर्णपणे वेगळ्या जगात घेऊन जाते. येथे नेटवर्क कमी आहे, ज्यामुळे डिजिटल डिटॉक्स आपोआप होतो. जानेवारीमध्ये बर्फाने झाकलेली ही व्हॅली खूप सुंदर दिसते आणि ध्यानधारणा, फिरणे आणि निसर्ग निरीक्षणासाठी सर्वोत्तम मानली जाते.

2. मार्गन टॉप (Margan Top), काश्मीर

मार्गन टॉप त्या लोकांसाठी आहे ज्यांना गर्दीपासून दूर, उंचावर जाऊन शांतता हवी आहे. ही उंच पर्वतीय खिंड बर्फाच्छादित दृश्ये, मोकळे आकाश आणि थंड वाऱ्यासाठी ओळखली जाते. येथे बसून सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहणे हा एक वेगळाच अनुभव देतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला येथे काही दिवस घालवल्याने मानसिक थकवा कमी होतो आणि लक्ष पुन्हा केंद्रित होते. फोटोग्राफी आणि सोलो प्रवासासाठी हे ठिकाण योग्य आहे.

3. चोर नाग तलाव (Chor Nag Lake), हिमाचल प्रदेश

चोर नाग तलाव हे हिमाचलमधील एक शांत, रहस्यमय आणि अत्यंत सुंदर सरोवर आहे. देवदारच्या जंगलांनी वेढलेले हे सरोवर गोंधळापासून पूर्णपणे दूर आहे. येथे इतकी शांतता आहे की, काही वेळ बसल्यानंतर मन आपोआप शांत होते. नवीन वर्षात येथे ट्रेकिंग केल्यानंतर तलावाच्या काठावर वेळ घालवणे तुम्हाला आतून ताजेतवाने करते. हे ठिकाण त्या लोकांसाठी आहे जे निसर्गात साधेपणा आणि शांतता शोधतात.