UPSC मुलाखतीत विचारलेले 5 'अवघड' प्रश्न!, चेक करा, तुम्ही उत्तरं देऊ शकता का?
UPSC मुलाखत म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानाची परीक्षा नाही, तर ती व्यक्तीच्या हजरजबाबीपणाची आणि तार्किक विचारांची चाचणी असते. अलीकडे UPSC परीक्षांमध्ये विचारलेले 5 रंजक प्रश्न जाणून घेऊयात.

हिंदीत 'पाढे' (Multiplication Tables) ला काय म्हणतात?
उत्तर: हिंदीमध्ये पाढ्यांना 'पहाडा' (Pahada) म्हणतात. मुलांना पाढे फक्त पाठ करायला लावण्याऐवजी, गुणाकार आणि बेरीज पद्धत समजावून सांगितल्यास, ते विसरले तरी स्वतः पाढे तयार करू शकतात.
नवीन जिल्हा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर: भारतात नवीन जिल्हा निर्माण करण्याचा अधिकार संबंधित राज्य सरकारला (State Government) असतो. लोकसंख्या वाढ आणि प्रशासकीय सोय या कारणांमुळे राज्य सरकार आपल्या अधिकाराचा वापर करून नवीन जिल्ह्यांची घोषणा करू शकते.
मेहंदी लावल्यावर हात लाल का होतात?
उत्तर: मेहंदीच्या पानांमध्ये 'लॉसोन' (Lawsone) नावाचे नैसर्गिक रसायन असते. ते आपल्या त्वचेतील 'केराटिन' (Keratin) नावाच्या प्रोटीनसोबत क्रिया करते, ज्यामुळे हातांना लाल-तपकिरी रंग येतो.
'भौगोलिक मानांकन' (GI Tag) म्हणजे काय? ते का दिले जाते?
उत्तर: GI म्हणजे Geographical Indication चे संक्षिप्त रूप. एखाद्या विशिष्ट भागात पिकणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंना (उदा. पैठणी साडी, कोल्हापुरी चप्पल) त्यांची ओळख जपण्यासाठी आणि बनावट उत्पादने रोखण्यासाठी हे मानांकन दिले जाते.
'Jungle' आणि 'Forest' मध्ये काय फरक आहे?
उत्तर:
• Forest (वन): हा सरकारने घोषित केलेला एक भाग असतो. यात काहीवेळा मानवनिर्मित किंवा लावलेल्या झाडांचाही समावेश असू शकतो.
• Jungle (जंगल): हा Forest चाच एक भाग असू शकतो. पण हे नैसर्गिकरित्या वाढलेले, खूप दाट आणि मानवी वावर नसलेले वनक्षेत्र दर्शवते.

