- Home
- Utility News
- PIB Fact Check : 2026 मध्ये ₹500 च्या नोटा बंद होणार?, सरकारने दिली महत्त्वाची माहिती
PIB Fact Check : 2026 मध्ये ₹500 च्या नोटा बंद होणार?, सरकारने दिली महत्त्वाची माहिती
PIB Fact Check : मार्च 2026 मध्ये ₹500 च्या नोटा बंद होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीमुळे लोकांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

₹500 च्या नोटेची बातमी -
“मार्च 2026 पर्यंत एटीएममधून ₹500 च्या नोटा बंद केल्या जातील” अशी माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. या बातमीमुळे लोकांमध्ये गोंधळ आणि भीती निर्माण झाली असून, केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
पीआयबीचे स्पष्टीकरण -
केंद्र सरकारचा मीडिया विभाग असलेल्या पीआयबीने (PIB) फॅक्ट चेकद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबीने स्पष्ट केले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ₹500 च्या नोटा मागे घेण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. “मार्च 2026 मध्ये ₹500 च्या नोटा बंद होणार” ही माहिती पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे.
₹500 ची नोटबंदी -
पीआयबीने असेही स्पष्ट केले आहे की ₹500 च्या नोटा आजही कायदेशीर चलन म्हणून वैध आहेत आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात. अधिकृत घोषणेशिवाय सोशल मीडियावर पसरणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असा इशाराही लोकांना देण्यात आला आहे.
₹500 च्या नोटा -
ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा ₹500 च्या नोटांवर बंदी घालण्यात येईल आणि पुन्हा नोटबंदी होईल अशा बातम्या पसरल्या आहेत. गेल्या जून महिन्यातही पीआयबीने अशाच प्रकारच्या माहितीचे खंडन केले होते. एका यूट्यूब व्हिडिओमध्ये एका न्यूज अँकरने ही अफवा पसरवली होती, ज्याचे सरकारने तात्काळ खंडन केले.

