- Home
- Utility News
- Paytm Balance Check Feature : नवीन फिचर लॉंच, एकाच ठिकाणी दिसणार तुमच्या सर्व बॅंक खात्यांमधील बॅलेन्स
Paytm Balance Check Feature : नवीन फिचर लॉंच, एकाच ठिकाणी दिसणार तुमच्या सर्व बॅंक खात्यांमधील बॅलेन्स
मुंबई - अनेक ग्राहकांचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतात. त्यामुळे आपल्याकडे एकूण किती पैसे आहेत हे पाहण्यासाठी प्रत्येक अकाउंट वेगवेगळे चेक करावे लागते. नंतर त्याची बेरीज करावी लागते. हीच अडचण दूर करण्यासाठी Paytm ने एक नवं फीचर आणलंय.

बॅलन्स चेक एकाच ठिकाणी
डिजिटल पेमेंट कंपनी Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक नवी सुविधा आणली आहे. UPI द्वारे जोडलेल्या सर्व बँक अकाउंट्सचा बॅलन्स एकाच ठिकाणी पाहता येईल. यामुळे वेगवेगळ्या अॅप्समध्ये जाण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. तसेच सर्व खात्यांचा वेगळा पासवर्ड लक्षात ठेवावा लागणार नाही.
एकाच ठिकाणी सर्व अकाउंटची माहिती
आधी प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स पाहण्यासाठी त्या त्या बँकेचे अॅप उघडावे लागायचे. आता Paytm अॅपवरून सर्व UPI लिंक असलेल्या अकाउंट्सचा बॅलन्स एकत्र पाहता येईल. विशेष म्हणजे हे फिचर अत्यंत सोपे आहे. अगदी काही क्षणांत तुम्हाला तुमचा बॅंक बॅलेंन्स बघता येतो.
UPI पिन द्वारे माहिती
हे फीचर वापरण्यासाठी प्रत्येक अकाउंटसाठी UPI पिन एकदा verify करावा लागेल. त्यानंतर Paytm अॅपमधील “बॅलन्स आणि हिस्ट्री” सेक्शनमध्ये सर्व अकाउंट्सचा बॅलन्स दिसेल. म्हणजे एकाच ठिकाणी हा बॅलेन्स दिसणार आहे. त्यासाठी वेगळे अॅप डाऊनलोड करावे लागणार नाही.
कोणाला उपयोगी?
हे फीचर नोकरी करणाऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी आणि ज्यांचे वेगवेगळे सेविंग अकाउंट आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. कारण त्यांना एकाच ठिकाणी सर्व बॅलन्सची माहिती मिळेल. तसेच महिलांनाही हे अत्यंत उपयोगी आहे. त्यांनाही एकाच ठिकाणी हा बॅलेन्स दिसेल.
हाताने बेरीज करण्याची गरज नाही
आता हाताने बेरीज करण्याची आणि प्रत्येक बँकेचे अॅप उघडण्याची गरज नाही. Paytm अॅपवरून सर्व बँकांची माहिती मिळेल. अनेकदा मोबाईलवर बॅलेन्स चेक करताना कॅलक्युलेटर वापरता येत नाही. अशा वेळी हातावर आकडेमोड करावी लागते. ते यामुळे वाचेल.
कसे चेक करायचे?
* Paytm अॅप उघडा.
* मनी ट्रान्सफर सेक्शनमधील 'बॅलन्स आणि हिस्ट्री' वर क्लिक करा.
* UPI लिंक असलेले अकाउंट्स दिसतील.
* 'चेक बॅलन्स' वर क्लिक करून UPI पिन टाका.
* बँक बॅलन्स आणि एकूण बॅलन्स दिसेल.

