MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Aadhaar Card Updates : आधार युजर्ससाठी मोठी बातमी! रेशनपासून आधार केंद्रापर्यंत 5 नवीन सुविधा सुरू

Aadhaar Card Updates : आधार युजर्ससाठी मोठी बातमी! रेशनपासून आधार केंद्रापर्यंत 5 नवीन सुविधा सुरू

आधार कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) १७ व्या आधार दिनानिमित्त ५ नवीन सुविधा सुरू केल्या आहेत. यामुळे आधारशी संबंधित कामे आता अधिक सोपी होणार आहेत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 02 2026, 04:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
आधार कार्डमधील नवीन बदल
Image Credit : Google

आधार कार्डमधील नवीन बदल

मुंबई : आधार कार्डधारकांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) २९ सप्टेंबर २०२६ रोजी १७ व्या आधार दिनानिमित्त ५ नवीन सुविधा लाँच केल्या आहेत. आधार सेवा अधिक सोप्या आणि सुरक्षित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः रेशन दुकानांवर ज्यांना फिंगरप्रिंट स्कॅन करताना अडचण येते, त्यांच्यासाठी आता 'फेस ऑथेंटिकेशन' (चेहरा ओळखण्याची सुविधा) सुरू केली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आता त्यांच्या ई-पीडीएस (e-PDS) सिस्टीममध्ये ही सुविधा जोडू शकतात. याचा अर्थ फिंगरप्रिंट पद्धत बंद होणार नाही, तर हा एक अतिरिक्त पर्याय असेल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आधारच्या नवीन सुविधा
Image Credit : Google

आधारच्या नवीन सुविधा

आधार सेवा केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आता नवीन 'क्यु मॅनेजमेंट सिस्टीम' (रांग व्यवस्थापन प्रणाली) आणली आहे. यामुळे लोक त्यांच्या नंबरनुसार सहज सेवा घेऊ शकतील. याशिवाय, सरकारी आणि पात्र बिगर-सरकारी संस्थांसाठी आधार पडताळणी सोपी करण्यासाठी Sub-AUA आणि KUA सिस्टीमचे नवीन फ्रेमवर्क आणले आहे. UIDAI च्या मते, नवीन सिस्टीम न बनवता जुन्याच इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून संस्थांना वेगाने जोडणे यामुळे शक्य होणार आहे.

Related Articles

Related image1
Aadhaar Card on WhatsApp : आधार कार्ड घरी विसरलात? सोप्या प्रोसेसने मिनिटांत डाउनलोड करा
35
आधार अपडेट
Image Credit : our own

आधार अपडेट

आधार पडताळणी वापरू इच्छिणाऱ्या पात्र बिगर-सरकारी संस्थांसाठी UIDAI ने 'SWIK Portal 2.0' लाँच केले आहे. या ऑनलाईन पोर्टलद्वारे संस्था संबंधित मंत्रालयाकडे किंवा विभागाकडे आधार पडताळणीच्या मंजुरीसाठी अर्ज करू शकतात. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल. या ५ बदलांपैकी सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे UIDAI ची नवीन वेबसाईट. युजर्सना माहिती सहज शोधता यावी यासाठी ही वेबसाईट पूर्णपणे अपडेट केली आहे.

45
आधार कार्यालय
Image Credit : our own

आधार कार्यालय

UIDAI च्या नवीन वेबसाईटवर स्क्रीन रीडर, फॉन्ट साईझ बदलण्याचा पर्याय, उत्तम कलर कॉन्ट्रास्ट आणि कीबोर्ड नेव्हिगेशन यांसारखे नवीन फीचर्स दिले आहेत. सध्या ही वेबसाईट १३ भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि भविष्यात ती २३ भाषांमध्ये आणण्याची योजना आहे. याशिवाय, नवीन वेबसाईटवर UIDAI चे रिक्रूटमेंट पोर्टलही जोडले आहे. याद्वारे डेप्युटेशनवर आधारित नोकऱ्यांसाठी उमेदवार आता ऑनलाईन अर्ज करू शकतील.

55
रेशन दुकान आधार
Image Credit : our own

रेशन दुकान आधार

या ५ नवीन सुविधांमुळे आधार युजर्सच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. विशेषतः रेशन दुकानांवर फिंगरप्रिंटचा त्रास सहन करणाऱ्यांसाठी फेस ऑथेंटिकेशन हा एक उत्तम पर्याय ठरेल. आधार केंद्रांवरील रांगांचे व्यवस्थापन सोपे करणे आणि नवीन वेबसाईटद्वारे माहिती सहज उपलब्ध करून देणे, यावर UIDAI ने भर दिला आहे. त्यामुळे आधारशी संबंधित सेवा वापरणाऱ्यांनी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या नवीन सुविधा आणि प्रक्रियांविषयी नक्की माहिती घ्यावी.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
New Generation Toyota Fortuner 2027 : प्रतीक्षा संपली! नव्या फॉर्च्युनरमध्ये काय असेल खास?
Recommended image2
Overseas Real Estate: परदेशात भारतीयांची घर खरेदी, गुंतवणुकीत मोठी वाढ!
Recommended image3
Diwali Business Idea : फक्त ५,००० रुपयांत घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय! दिवाळीत होईल बंपर कमाई
Recommended image4
Honda CR-V Hybrid: होंडाची 'ती' प्रीमियम SUV पुन्हा भारतात येणार?
Recommended image5
Samsung vs LG Smart TV : सॅमसंग की एलजी? तुमच्या पैशांसाठी कोणता टीव्ही बेस्ट आहे, वाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट
Related Stories
Recommended image1
Aadhaar Card on WhatsApp : आधार कार्ड घरी विसरलात? सोप्या प्रोसेसने मिनिटांत डाउनलोड करा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved