- Home
- Utility News
- गोव्याच्या बिचवरुन ठेवले नाव, वाचा TVS ची माचो बाईक Ronin Agonda Edition चे फिचर्स आणि किंमत!
गोव्याच्या बिचवरुन ठेवले नाव, वाचा TVS ची माचो बाईक Ronin Agonda Edition चे फिचर्स आणि किंमत!
TVS Ronin Agonda Edition Price Design Features : TVS मोटर कंपनीने आपली आधुनिक-रेट्रो बाईक Ronin मॉडेलमध्ये Agonda नावाचे नवीन स्पेशल एडिशन सादर केले आहे. ही बाईक गोव्याच्या अगोंडा बीचवर आधारित आहे.

TVS रोनिन अगोंडा एडिशन
TVS मोटर कंपनीने आपली लोकप्रिय आधुनिक-रेट्रो मोटरसायकल TVS Ronin चे नवीन स्पेशल एडिशन म्हणून Ronin Agonda Edition मॉडेल सादर केले आहे. हे नवीन व्हेरिएंट MotoSoul 5.0 कार्यक्रमात लाँच करण्यात आले. Ronin मॉडेलवर आधारित लिमिटेड एडिशन बाईक्सच्या मालिकेची सुरुवात म्हणून या Agonda एडिशनकडे पाहिले जात आहे.
TVS रोनिनचे नवीन मॉडेल
या बाईकचे नाव आणि डिझाइन थीम गोव्याच्या अगोंडा बीचवरून प्रेरित आहे. TVS च्या मते, हे एडिशन शांतता आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण जीवनशैलीचे प्रतीक आहे. पांढऱ्या रंगावर आधारित, विंटेज लूक देणारे पाच-लाइन ग्राफिक्स या बाईकला एक खास ओळख देतात. या रेषा संपूर्ण बाईकवर अलगदपणे पसरलेल्या आहेत, ज्यामुळे एक हलके आणि आकर्षक डिझाइन तयार होते.
TVS रोनिन स्पेशल एडिशन
आठवड्याच्या दिवसात शहरात फिरणाऱ्या आणि वीकेंडला कॅफे राईड किंवा बीचवर फिरायला जाणाऱ्या रायडर्सना हे डिझाइन नक्कीच आवडेल. सामान्य रोनिन मॉडेल मिडनाईट ब्लू, ग्लेशियर सिल्व्हर, आणि चारी एम्बर सारख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. डिझाइनमधील बदलांव्यतिरिक्त, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणताही बदल केलेला नाही.
TVS रोनिनची किंमत
बाईकमध्ये असिमेट्रिक स्पीडोमीटर, ॲडजस्टेबल लिव्हर, स्लिपर क्लच, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल/एसएमएस अलर्ट, SmartXonnect सुविधा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या Ronin Agonda Edition मध्ये 225.9cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन वापरले आहे. हे 20.1 hp पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क निर्माण करते. 5-स्पीड गिअरबॉक्सद्वारे पॉवर मागील चाकाला पाठवली जाते. याची किंमत ₹1,30,990 (एक्स-शोरूम) आहे.

