- Home
- Utility News
- Viral Video Of Giant Santa : बुर्ज खलिफासमोर हजारो ड्रोन्सचा भव्य सांता, व्हिडिओमागचं सत्य काय?
Viral Video Of Giant Santa : बुर्ज खलिफासमोर हजारो ड्रोन्सचा भव्य सांता, व्हिडिओमागचं सत्य काय?
दुबई: ख्रिसमस सेलिब्रेशनचा भाग म्हणून दुबईतील बुर्ज खलिफाजवळ आकाशात एक भव्य सांताक्लॉज तयार केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

आकाशाला भिडणारा 'भव्य सांता' -
दुबईतील बुर्ज खलिफाजवळ हजारो ड्रोन्सनी मिळून आकाशात एक भव्य सांताक्लॉज तयार केल्याचा व्हिडिओ अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यासह अनेक दिग्गजांनी शेअर केला होता.
सांताचा व्हिडिओ -
हा व्हिडिओ आतापर्यंत 3.6 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पण या आश्चर्यकारक दृश्यामागील सत्य काही वेगळंच आहे.
भव्य सांता -
बुर्ज खलिफाच्या अगदी जवळ आकाशात ड्रोन्सनी हात हलवणारा सांताक्लॉज तयार केल्याचा हा फक्त 3 सेकंदांचा व्हिडिओ आहे.
एलॉन मस्क यांचीही झाली चूक -
अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यासह अनेक दिग्गजांनी हा व्हिडिओ शेअर केला. पर्यटकांनी मोबाईल फोनवर शूट केल्यासारखं दिसणारं हे दृश्य पाहिल्यावर कोणालाही ते खरंच वाटेल.
सहिष्णुता आणि उत्सवांचे कौतुक -
दुबई शहराची सहिष्णुता आणि उत्सवांचे कौतुक करत हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला.
फावेझ सयातीची VFX कमाल -
खरं तर, हा व्हिडिओ ड्रोन वापरून शूट केलेला नाही, तर VFX तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केला आहे. UAE मधील VFX आर्टिस्ट फावेझ सयाती (Fawes Zayati) याने तो तयार केला आहे.
भव्य सांता खरा नाही -
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, फावेझने एलॉन मस्कला उद्देशून इंस्टाग्रामवर लिहिले, 'प्रिय मित्र एलॉन मस्क, हा व्हिडिओ मी दोन वर्षांपूर्वी बनवला होता. तो खोटा आहे. तुम्हाला हवं असेल तर पुढच्या वेळी मी सांताक्लॉजऐवजी तुमचा चेहरा तयार करू शकेन'.
खोटे व्हिडिओ -
तंत्रज्ञान जसजसे वाढत आहे, तसतसे खरे वाटणारे खोटे व्हिडिओ बनवणे सोपे झाले आहे. फावेझने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये तो एक VFX आर्टिस्ट असल्याचे स्पष्ट केले असले तरी, अनेकांनी त्याकडे लक्ष न देता व्हिडिओ व्हायरल केला.

