7-सीटर प्रीमियम SUV महागली, तरीही मागणी का कमी होईना? या गाडीमध्ये काय आहे खास?
शक्तिशाली परफॉर्मन्स, प्रीमियम लूक आणि रस्त्यावरचा दमदार रुबाब यामुळे फॉर्च्युनर लोकप्रिय आहे. सर्वात लोकप्रिय मोठ्या एसयूव्हीपैकी एक असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरची किंमत वाढली आहे. आता ही किंमत 74,000 रुपयांपर्यंत वाढली आहे.

टोयोटा फॉर्च्युनरच्या किंमतीत वाढ
टोयोटाने अलीकडेच भारतातील आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून, देशातील सर्वात लोकप्रिय मोठ्या एसयूव्हीपैकी एक असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरची किंमत वाढली आहे. शक्तिशाली परफॉर्मन्स, प्रीमियम लूक आणि रस्त्यावरचा दमदार रुबाब यामुळे फॉर्च्युनर लोकप्रिय आहे. आता तिची किंमत 74,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. व्हेरियंटनुसार फॉर्च्युनरची किंमत 51,000 ते 74,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच कंपनीने ‘लिमिटेड-टाइम लीडर’ व्हेरियंट बंद केल्याचेही म्हटले जात आहे.
फॉर्च्युनरची नवीन किंमत 2026
या दरवाढीमुळे फॉर्च्युनरची किंमत 74,000 रुपयांपर्यंत वाढली आहे, तर 'लेजेंडर' व्हेरियंटची किंमत 71,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. विशेषतः, 4x4 व्हेरियंटच्या किमती सर्वाधिक वाढल्याचे सांगितले जात आहे. एंट्री-लेव्हल मॅन्युअल व्हेरियंटसाठी 51,000 रुपयांची सर्वात कमी वाढ आहे. याची सध्याची एक्स-शोरूम किंमत 34.16 लाख रुपये आहे. पूर्वी ही किंमत 33.65 लाख रुपये होती.
7-सीटर एसयूव्हीची किंमत
सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरियंट सुमारे 55,000 रुपयांच्या वाढीसह उपलब्ध आहे. टॉप मॉडेल असलेल्या GRS व्हेरियंटसाठी 74,000 रुपयांची सर्वाधिक वाढ जाहीर करण्यात आली आहे. याची किंमत 48.85 लाख रुपयांवरून 49.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही 7-सीटर क्षमतेची मोठी एसयूव्ही आहे. 4x4 क्षमता, मजबूत बनावट आणि टोयोटाची विश्वासार्हता यामुळे किंमत वाढूनही बाजारात तिची मागणी कायम आहे.

