मार्केट क्रॅशमध्येही हे 5 PSU शेअर्स देतील नफ्याचे संकेत
5 Jackpot PSU Stocks: ट्रम्प यांच्या टॅरिफ टेररनंतर 7 एप्रिलला शेअर बाजार कोसळला आहे, गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहेत, पण याच घसरणीत काही PSU स्टॉक्स तुम्हाला गप्पगुमान श्रीमंत करू शकतात. यांचे फंडामेंटल्स स्ट्रॉन्ग आहेत. पहा लिस्ट…
- FB
- TW
- Linkdin
)
1. HAL Share Price Target
ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरवर डाव लावण्याचा सल्ला दिला आहे. याचे टारगेट प्राईस 5,000 रुपये दिले आहे. 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शेअर 6.36% नी घसरून 3,969.30 रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,675 रुपये आणि नीचांक 3,045.95 रुपये आहे.
2. GAIL Share Price Target
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने गेलच्या शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याचे टारगेट प्राईस 245 रुपये दिले आहे. सोमवार, 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शेअर 5.71% नी घसरून 166.52 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 246.35 रुपये आणि नीचांक 150.60 रुपये आहे.
3. Power Grid Share Price Target
ब्रोकरेज फर्म शेअरखानने पॉवर ग्रिडच्या शेअरवर डाव लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरचे टारगेट प्राईस 350 रुपये दिले आहे. 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शेअर 1.28% नी घसरून 290.15 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 366.20 रुपये आणि नीचांक 247.50 रुपये आहे.
4. IREDA Share Price Target
ब्रोकरेज जिओजित फायनान्शियल सर्विसेसने इरेडाच्या शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याचे टारगेट प्राईस 196 रुपये दिले आहे. 7 एप्रिल रोजी शेअर सकाळी 11 वाजेपर्यंत 5.72% नी घसरून 147.50 वर व्यवहार करत आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 310 रुपये आणि नीचांक 137 रुपये आहे.
5. NHPC Share Price Target
एचडीएफसी सिक्युरिटीजने शॉर्ट टर्मसाठी एनएचपीसी शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 15 दिवसांसाठी याचे टारगेट प्राईस 89.5 रुपये दिले आहे. 7 एप्रिल रोजी शेअर सकाळी 11 वाजेपर्यंत 1.38% नी घसरून 81.89 रुपयांवर ट्रेड करत आहे.
नोट- कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी आपल्या मार्केट एक्सपर्टचा सल्ला जरूर घ्या.