Low Seat Scooters : 90 हजारांच्या आत मिळणाऱ्या 5 हलक्या आणि लो-सीट स्कूटर्स
९० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या ५ हलक्या आणि कमी सीट हाईट असलेल्या बेस्ट स्कूटर्सची माहिती आपण इथे पाहणार आहोत.

कमी सीट हाईट असलेल्या स्कूटर्स
तुमची उंची कमी असेल तर नवीन स्कूटर घेताना तिची सीट हाईट आणि वजन खूप महत्त्वाचं ठरतं. ट्रॅफिकमध्ये थांबताना किंवा गाडी पार्क करताना पाय जमिनीवर टेकले नाहीत, तर जड आणि उंच स्कूटर चालवणं कठीण जातं. या समस्येवर उपाय म्हणून, ९० हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या ५ हलक्या स्कूटर्सची माहिती…

टीव्हीएस स्कूटी झेस्ट ११० (TVS Scooty Zest 110)
कमी उंची असलेल्या लोकांसाठी ही एक अतिशय प्रॅक्टिकल आणि उत्तम स्कूटर आहे.
सीट हाईट - ७६० मिमी (गाडी थांबवताना पाय सहज जमिनीवर टेकतात)
इंजिन - १०९.७ सीसी एअर-कूल्ड इंजिन
वजन - १०३ किलो (हँडल करायला खूप सोपी)
वैशिष्ट्ये - १९ लिटर अंडर-सीट स्टोरेज, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, ट्यूबलेस टायर्स
मायलेज - ४५ ते ५० किमी प्रति लिटर
एक्स-शोरूम किंमत - अंदाजे ७०,००० ते ७५,००० रुपये
यामाहा फॅसिनो १२५ एफआय हायब्रिड (Yamaha Fascino 125 Fi Hybrid)
ज्यांना थोडं जास्त पॉवर असलेलं १२५ सीसी इंजिन हवंय आणि गाडीही हलकी असावी असं वाटतं, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
सीट हाईट - ७८० मिमी
वजन - ९८ ते ९९ किलो
वैशिष्ट्ये - स्मार्ट मोटर जनरेटर तंत्रज्ञान (पिकअप सोपा करते), २१ लिटर स्टोरेज, एलईडी लाईटिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
मायलेज - ४९ ते ५५ किमी प्रति लिटर
एक्स-शोरूम किंमत - अंदाजे ७८,००० ते ९०,००० रुपये
हिरो प्लेझर+ एक्सटेक (Hero Pleasure+ XTEC)
कॉम्पॅक्ट डिझाईन आणि हलक्या वजनामुळे ही स्कूटर रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट बनवली आहे.
सीट हाईट - ७६५ मिमी
वजन - सुमारे १०४ ते १०६ किलो
इंजिन - ११०.९ सीसी इंजिन
वैशिष्ट्ये - ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल/एसएमएस अलर्ट, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट
मायलेज - अंदाजे ५० किमी प्रति लिटर
एक्स-शोरूम किंमत - सुमारे ७०,००० ते ८५,००० रुपये
टीव्हीएस स्कूटी पेप+ (TVS Scooty Pep+)
अतिशय हलक्या वजनाची गाडी चालवू इच्छिणाऱ्या नवशिक्या रायडर्समध्ये ही स्कूटर खूप लोकप्रिय आहे.
सीट हाईट - सुमारे ७६५ मिमी
वजन - ९३ ते ९५ किलो (अरुंद रस्त्यांवर आणि ट्रॅफिकमध्ये चालवायला एकदम सोपी)
इंजिन - ८७.८ सीसी इंजिन
मायलेज - अंदाजे ५० किमी प्रति लिटर
सध्या या मॉडेलचे नवीन उत्पादन बंद झाले आहे, त्यामुळे ही स्कूटर तुम्हाला फक्त सेकंड-हँड मार्केटमध्येच मिळू शकेल.
यामाहा रे झेडआर १२५ हायब्रिड (Yamaha RayZR 125 Fi Hybrid)
स्पोर्टी लूक आणि कमी वजन असलेली स्कूटर शोधणाऱ्या कमी उंचीच्या रायडर्ससाठी यामाहा रे झेडआर हा एक परफेक्ट पर्याय आहे.
सीट हाईट - ७८५ मिमी
वजन - ९९ किलो
इंजिन - फॅसिनोप्रमाणेच यातही १२५ सीसी हायब्रिड इंजिन प्लॅटफॉर्म वापरला आहे.
वैशिष्ट्ये - स्पोर्टी डिझाईन, स्टॉप-स्टार्ट सिस्टीम, उत्तम पिकअप
मायलेज - ४९ ते ५५ किमी प्रति लिटर
एक्स-शोरूम किंमत - अंदाजे ७८,००० ते ९०,००० रुपये

