मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील Top 4 सनरुफ असलेल्या स्टायलिश कार!
Top 4 Budget Sunroof Cars In India : आजकाल सनरूफ स्वस्त कारमध्येही उपलब्ध आहेत. Hyundai Exter, Tata Punch, Hyundai i20 आणि Tata Altroz ही बजेटमधील सनरूफ असलेली चार उत्तम मॉडेल्स आहेत. या लेखात त्यांच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली आहे.

सनरूफला मोठी पसंती
आजकाल वाहनांमध्ये सनरूफ हे एक लोकप्रिय फीचर बनले आहे. एक बटण दाबताच, सूर्यप्रकाश आणि ताजी हवा कारमध्ये येते. शिवाय सनरुफमधून बाहेर डोकावणे मुलांना, तरुणींना आणि काही उत्साही तरुणांना खुप आवडते. त्यामुळे अशा कार घेण्याकडे कल वाढत आहे.
आता बहुतेक कारमध्ये सनरूफ
पूर्वी हे फीचर फक्त महागड्या SUV मध्ये उपलब्ध होते, पण आता अनेक लहान आणि परवडणाऱ्या गाड्यांमध्येही सनरूफ दिले जात आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांनाही अशा कार घेणे शक्य झाले आहे. आज आम्ही अशाच कारची माहिती आपल्यासाठी आणली आहे.
या चार लहान कार्सचा विचार करू शकता
तुम्ही कमी बजेटमध्ये सनरूफ असलेल्या कारचा विचार करत असाल, तर या चार लहान कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. त्यामुळे तुमच्या खिशालाही जास्त झळ बसणार नाही. आणि तुमचे कुटुंबही आनंदी राहिल. त्यांना अशा सनरुफचे रिल्सही बनवता येतील.
Hyundai Exter
या यादीतील पहिले नाव Hyundai Exter आहे. सनरूफ असलेल्या या मायक्रो SUV च्या S Smart व्हेरिएंटची किंमत 7 लाख रुपये आहे. यात 1.2L पेट्रोल इंजिन आहे, जे 81.8 bhp पॉवर देते. यात 391 लीटर बूट स्पेस मिळतो.
Tata Punch
Tata Punch सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. याचे सनरूफ फीचर Adventure S व्हेरिएंटपासून मिळते, ज्याची किंमत 7 लाख रुपये आहे. यात 88 hp पॉवर देणारे 1.2L पेट्रोल इंजिन आहे. ही AMT आणि CNG पर्यायातही उपलब्ध आहे.
Hyundai i20
Hyundai i20 ही सनरूफ पर्यायासह येणारी प्रीमियम हॅचबॅक आहे. Magna व्हेरिएंटची किंमत ₹8.27 लाख आहे. यात 87 bhp पॉवर देणारे 1.2L पेट्रोल इंजिन आहे. i20 सुमारे 20 kmpl मायलेज आणि 311 लीटर बूट स्पेस देते.
Tata Altroz
टाटाची लोकप्रिय हॅचबॅक Altroz च्या Pure S व्हेरिएंटमध्ये सनरूफ मिळतो, ज्याची किंमत 7.36 लाख रुपये आहे. यात 86.79 bhp पॉवर देणारे 1.2L पेट्रोल इंजिन आहे. कारमध्ये 345 लीटर बूट स्पेस मिळतो.

