Kidney Problems : लघवीतील या बदलांमुळे किडनीचं आरोग्य धोक्यात, आताच वाचा
Kidney Problems : किडनी हा मानवी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारा अवयव आहे. अनेक कारणांमुळे किडनीचे आरोग्य बिघडू शकते. किडनी धोक्यात असल्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊयात.

लघवीतील हे बदल किडनी धोक्यात असल्याचे संकेत -
किडनी हा मानवी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारा अवयव आहे. अनेक कारणांमुळे किडनीचे आरोग्य बिघडू शकते. किडनी धोक्यात असल्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊयात.
लघवीच्या रंगात बदल -
लघवीचा गडद रंग, तपकिरी, गडद पिवळा, गुलाबी रंग हे किडनी धोक्यात असल्याचे संकेत असू शकतात.
लघवीतून रक्त येणे -
लघवीतून रक्त येणे हे देखील किडनी धोक्यात असल्याचे लक्षण असू शकते.
लघवीचे प्रमाण कमी होणे -
लघवीचे प्रमाण कमी होणे, वारंवार लघवीला जाणे, लघवीची भावना होणे पण ती न होणे याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
रात्री अनेक वेळा लघवीला जाणे -
रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणे हे किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते.
पायावर आणि चेहऱ्यावर सूज -
किडनीचे कार्य मंदावल्यास पायावर, हातावर, डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर सूज येऊ शकते. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या कराव्यात.
त्वचेचे आजार आणि खाज -
किडनी खराब झाल्यास शरीरातील विषारी पदार्थ आणि क्षार रक्तात जमा होतात. यामुळे त्वचेचे आजार आणि खाज येऊ शकते.
अति थकवा आणि अशक्तपणा -
थकवा आणि अशक्तपणा अनेक कारणांमुळे येऊ शकतो. पण किडनीच्या समस्यांमुळेही थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.
डॉक्टरांचा सल्ला -
वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच आजाराची खात्री करा.

