Lifestyle

नॉन-व्हेज खवय्यांसाठी हटके रेसिपी, नक्की ट्राय करा ठेचा कोळंबी

Image credits: Social Media

सामग्री

7-8 कमी तिखट मिरची, 2 मोठे चमचे तेल, 2 चमचे जीरे, अर्धा कप शेंगदाणे, 10-15 कोळंबी, 1 चमचा हळद आणि मीठ चवीनुसार. 

Image credits: Social Media

पॅनमध्ये तेल गरम करा

सर्वप्रथम मिरच्या बारीक कापून घ्या आणि गॅसवर पॅन गरम करत ठेवून त्यामध्ये तेल टाका.

Image credits: social media

गरम तेलात सामग्री मिक्स करा

तेल गरम झाल्यानंतर जीरे पावडर, लसूण पाकळ्या, शेंगदाणे टाकून सर्व गोष्टी व्यवस्थितीत भाजून घ्या. आता तेलात बारीक चिरलेल्या मिरच्या मिक्स करुन वरुन चवीनुसार मीठ घाला.

Image credits: Instagram

सामग्री खलबत्यात बारीक कुटून घ्या

पॅनमधूनन ठेचासाठी वापरलेली सामग्री खलबत्यात काढून घेत बारीक कुटून घ्या.

Image credits: Instagram

कोळंबीला मीठ आणि हळद लावून ठेवा

एका बाऊलमध्ये कोळंबी घेत त्यात मीठ आणि एक चमचा हळद टाकून दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करुन 10 मिनिटांसाठी ठेवा.

Image credits: Social Media

पॅनमध्ये ठेचा आणि कोळंबी मिक्स करा

पॅनमध्ये पुन्हा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला ठेचा आणि कोळंबी घाला.

Image credits: Facebook

अशी तयार होईल रेसिपी

पॅनमध्ये 5-10 मिनिटे कोळंबी शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Image credits: Instagram