TDCC Bank Bharti 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १६५ कनिष्ठ लिपिक, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक पदांसाठी भरती सुरू. इच्छुक उमेदवार २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
TDCC Bank Bharti 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! बँकेत कनिष्ठ लिपिक, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक अशा एकूण १६५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २९ ऑगस्ट २०२५ संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव जागा
कनिष्ठ लिपिक 123
शिपाई 36
सुरक्षा रक्षक 5
वाहनचालक 1
एकूण 165
निवड प्रक्रिया
निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत यांच्या आधारे केली जाईल.
ऑनलाइन परीक्षा
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात
विषय: गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व IT, अभियोग्यता
माध्यम: मराठी व इंग्रजी
परीक्षेची तारीख लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर होईल
मुलाखत व कागदपत्र पडताळणी
ऑनलाइन परीक्षेत पात्र उमेदवारांना १:३ च्या प्रमाणात मुलाखतीसाठी बोलावले जाईल
एकूण १० गुण – ५ गुण शैक्षणिक पात्रता व अनुभवासाठी, ५ गुण मुलाखतीतील कामगिरीवर आधारित
पगार आणि प्रोबेशनरी कालावधी
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक वर्षाचा प्रोबेशनरी कालावधी राहील.
पद मासिक वेतन (प्रोबेशनरी कालावधीत)
कनिष्ठ लिपिक ₹20,000/-
शिपाई, सुरक्षा रक्षक, वाहनचालक ₹15,000/-
अर्ज शुल्क (Online Payment Only)
पद शुल्क GST एकूण
कनिष्ठ लिपिक ₹800 ₹144 ₹944
इतर पदे ₹500 ₹90 ₹590
नोंद: शुल्क भरल्याशिवाय अर्ज मान्य होणार नाही.
शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहिती
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अटी अधिकृत वेबसाइटवर तपासाव्यात.
अधिकृत वेबसाइट्स
www.thanedistrictbank.com
www.thanedccbank.com
महत्वाच्या सूचना
अर्जाची अंतिम तारीख: २९ ऑगस्ट २०२५, संध्या. ५:०० वाजेपर्यंत
वेळोवेळी अद्ययावत माहितीसाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या
तांत्रिक अडचणींसाठी हेल्पलाईन: ९१-९१५६०३२५९८
ईमेल: support@thanedccbank.com
बँकेने कोणतीही बाह्य भरती संस्था नेमलेली नाही


