MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Health Tips: खरबूज म्हणजे निसर्गाचं वरदान; रोज खाल्ल्यास शरीरात घडेल ही जादू!

Health Tips: खरबूज म्हणजे निसर्गाचं वरदान; रोज खाल्ल्यास शरीरात घडेल ही जादू!

Health Tips: उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांमध्ये खरबूज सर्वात आरोग्यदायी आहे. उन्हाच्या त्रासापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी हे फळ म्हणजे निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. पण हे फळ रोज खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात, तुम्हाला माहिती आहे का?

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 19 2026, 10:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
खरबूज
Image Credit : Gemini

खरबूज

खरबूज म्हणजे फक्त एक चविष्ट फळ नाही, तर ते न्यूट्रिएंट्सचं पॉवरहाऊस आहे. यात कॅलरीज खूप कमी असतात, पण शरीराला आवश्यक विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर मिळतात. खरबुजामध्ये तब्बल 90 % पाणी असतं. सोबतच, यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फोलेट, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे पोषक घटकही मोठ्या प्रमाणात आढळतात.

23
फायदे
Image Credit : Getty

फायदे

१. डिहायड्रेशनपासून बचाव: खरबुजामध्ये 90% पाणी असल्यामुळे, उन्हाळ्यात घामामुळे शरीरात कमी झालेली पाण्याची पातळी हे फळ भरून काढतं. यामुळे त्वचा ओलसर राहते. २. शरीराला थंडावा: खरबूज नैसर्गिक कूलंटप्रमाणे काम करतं. ते शरीराला आतून थंड ठेवतं आणि उष्माघाताचा धोका टाळतं. दुपारी खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते. ३. पचनक्रिया सुधारते: यात फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात आणि पोट हलकं राहतं.

Related Articles

Related image1
Summer Health Care : उन्हाळ्यात कलिंगड खा आणि रहा फ्रेश! त्वचा व आरोग्यासाठी 5 जबरदस्त फायदे
Related image2
Summer Health Care : उन्हाळ्यात एनर्जी ड्रिंक्स पिणे ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
33
4. अतिरिक्त फायदे
Image Credit : our own

4. अतिरिक्त फायदे

४. इम्युनिटी वाढवते: यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर असतं. हे घटक इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि पांढऱ्या रक्त पेशींची निर्मिती वाढवतात.५. ब्लड प्रेशर कंट्रोल: खरबुजामधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.६. डोळ्यांसाठी फायदेशीर: यातील बीटा-कॅरोटीनमुळे दृष्टी सुधारते आणि वाढत्या वयानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या कमी होतात.खरबूज कसं खावं? तुम्ही याच्या फोडी करून लिंबू पिळून सॅलड म्हणून खाऊ शकता किंवा साखरेविना ज्यूस बनवू शकता. विशेष म्हणजे, याच्या बिया वाळवून वर्षभर वापरता येतात, त्याही खूप पौष्टिक असतात.

About the Author

MD
Marathi Desk 1
आरोग्य

Recommended Stories
Recommended image1
Bamboo Decor: बांबूच्या ८ वस्तूंनी बदला घराचा लुक, कमी खर्चात मिळेल रॉयल फील!
Recommended image2
Home Remedies: हेअर डाय करताना चेहऱ्यावर डाग लागतात? हे सोपे उपाय करून बघा!
Recommended image3
Travel Guide: साहसी असाल तर लडाख, शांतता हवी असल्यास तवांग... मूडनुसार फिरा या ठिकाणी
Recommended image4
Plus Size Fashion: प्लस साइज महिलांसाठी कॉटन दुपट्टा सूट, दिवसभर आरामदायी राहण्यासाठी ६ बेस्ट डिझाइन्स
Recommended image5
May Horoscope 2026: या राशींवर पैशांचा पाऊस, पण एका राशीसाठी महिना ठरणार अशुभ!
Related Stories
Recommended image1
Summer Health Care : उन्हाळ्यात कलिंगड खा आणि रहा फ्रेश! त्वचा व आरोग्यासाठी 5 जबरदस्त फायदे
Recommended image2
Summer Health Care : उन्हाळ्यात एनर्जी ड्रिंक्स पिणे ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved