Palazzo Pants उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी पलाझो पॅन्ट्स हा एक उत्तम पर्याय आहे. पण त्या नेहमी एकाच प्रकारे घालून कंटाळा आला असेल, तर काही नवीन स्टायलिंग आयडियाज जाणून घ्या. यामुळे तुम्हाला कूल आणि क्लासी लुक मिळेल.

Palazzo Styling Ideas: उन्हाळा आला की असे कपडे घालावेसे वाटतात, जे आरामदायक तर असतीलच, पण स्टायलिशही दिसतील. अशावेळी पलाझो पॅन्ट्स (Palazzo Pants) हा एक उत्तम पर्याय ठरतो. याचं कापड हलकं असतं, फिटिंग सैलसर असते आणि डिझाइनही ट्रेंडी असतं. त्यामुळे सगळ्या वयोगटातल्या महिलांना पलाझो आवडतात. तुम्हीही नेहमी एकाच प्रकारे पलाझो घालून कंटाळला असाल, तर यावेळी काहीतरी नवीन ट्राय करून बघा. योग्य टॉप, चपला आणि ॲक्सेसरीजसोबत साधी पलाझो पॅन्टसुद्धा एकदम क्लासी आणि मॉडर्न लुक देऊ शकते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

क्रॉप टॉपसोबत करा स्टाईल

उन्हाळ्यात पलाझो आणि क्रॉप टॉपचं कॉम्बिनेशन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा लुक तुम्हाला कूल आणि स्टायलिश दोन्ही दाखवतो. फ्लोरल किंवा पेस्टल रंगाच्या पलाझोसोबत साधा क्रॉप टॉप घातल्यास तुमचा लुक एकदम हटके दिसेल. मग ते कॅज्युअल आउटिंग असो किंवा कॉलेज कॅम्पस, हा लुक सगळीकडेच छान दिसतो.

कुर्तीसोबत मिळवा एलिगंट लुक

जर तुम्हाला आरामासोबत थोडा पारंपरिक टच हवा असेल, तर तुम्ही पलाझो स्ट्रेट-कट किंवा शॉर्ट कुर्तीसोबत घालू शकता. सुती कापडाच्या कुर्ती उन्हाळ्यात खूप आरामदायक वाटतात. यावर कानात छोटेसे डूल आणि पायात फ्लॅट सँडल घातल्यास तुमचा लुक आणखी आकर्षक दिसेल.

बेल्ट लावून द्या मॉडर्न ट्विस्ट

एखाद्या साध्या पलाझोला आणखी स्टायलिश बनवण्यासाठी तुम्ही बेल्टचा वापर करू शकता. लांब टॉप किंवा शर्टवर पातळ बेल्ट लावल्यास तुमचा ड्रेस जास्त फॅशनेबल आणि स्मार्ट दिसतो. ही स्टाईल इतकी व्हर्सेटाईल आहे की तुम्ही ऑफिस आणि पार्टी, दोन्ही ठिकाणी सहज कॅरी करू शकता.

योग्य फुटवेअरने लुक होईल परफेक्ट

पलाझोसोबत योग्य फुटवेअर निवडणंही खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात फ्लॅट सँडल, कोल्हापुरी चप्पल किंवा पांढरे स्नीकर्स पलाझोसोबत खूप छान दिसतात. हे केवळ आरामच देत नाहीत, तर तुमचा संपूर्ण लुक ट्रेंडी आणि क्लासी बनवण्यातही मदत करतात.

हलक्या दागिन्यांनी लुक पूर्ण करा

उन्हाळ्यात जड दागिन्यांऐवजी हलके दागिने घालणं जास्त चांगलं. कानात छोटे हूप इअररिंग्स, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी किंवा साधं ब्रेसलेट पलाझोसोबत घातल्यास तुमच्या लुकला एक वेगळाच टच येतो. यामुळे तुमची स्टाईल साधी असूनही खूप आकर्षक दिसते.