MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Sonam Wangchuk House : सोनम वांगचुक यांच्या घरात थंडी लागत नाही, रहस्य काय

Sonam Wangchuk House : सोनम वांगचुक यांच्या घरात थंडी लागत नाही, रहस्य काय

लडाखच्या कडाक्याच्या थंडीत जिथे बहुतेक घरं हीटर किंवा इंधनावर अवलंबून असतात, तिथे इंजिनिअर आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी बांधलेलं एक मातीचं घर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे.

2 Min read
Author : Jaywant Patil
Published : Jul 28 2026, 03:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सोनम वांगचुक यांचं मातीचं घर
Image Credit : Instagram

सोनम वांगचुक यांचं मातीचं घर

लडाखचे इंजिनिअर, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक फक्त त्यांच्या सामाजिक कार्यासाठीच नाही, तर त्यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या उपोषणामुळे ते पुन्हा चर्चेत आले, आणि त्याचबरोबर लडाखमधील त्यांच्या घराच्या अनोख्या रचनेची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
लडाखमधील मातीचं घर
Image Credit : Instagram

लडाखमधील मातीचं घर

सुमारे तीन वर्षांपूर्वी एका व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक यांनी त्यांच्या 'ट्रायबल हाऊस'ची ओळख करून दिली होती. हे घर पूर्णपणे मातीने बांधलेले असून त्यात सिमेंटचा वापर केलेला नाही. यात लडाखची पारंपरिक वास्तुकला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ आहे. पारंपरिक बांधकाम पद्धती पूर्णपणे सोडून देऊ नये, हाच आपला उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

तत्काळ तिकीट बुक करताय? १ ऑगस्टपासून हा नवीन नियम लागू!

Related Articles

Related image1
लेह-लडाख: प्रवाशांसाठी आवर्जून भेट द्यावी अशी ठिकाणे
Related image2
Travel Guide: साहसी असाल तर लडाख, शांतता हवी असल्यास तवांग... मूडनुसार फिरा या ठिकाणी
35
ट्रायबल हाऊस
Image Credit : ANI

ट्रायबल हाऊस

या घराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'पॅसिव्ह सोलर हीटिंग' तंत्रज्ञान. हिवाळ्यात लाकूड किंवा हीटर न वापरता, घराला उबदार ठेवण्यासाठी एक खास 'काळी भिंत' वापरली आहे. या भिंतीवर लावलेल्या पाण्याच्या बाटल्या दिवसा सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि रात्री हळूहळू ती उष्णता बाहेर सोडतात. यामुळे कडाक्याच्या थंडीतही घरातील तापमान नैसर्गिकरित्या उबदार राहतं. तर दुसरीकडे, मातीच्या भिंती उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यास मदत करतात.
45
हीटर नसलेलं घर
Image Credit : Instagram

हीटर नसलेलं घर

घराची अंतर्गत रचनाही लडाखच्या परंपरेचं दर्शन घडवते. जमिनीलगतची बसण्याची सोय, ओपन किचन आणि त्याला लागूनच जेवणाची जागा, हे सगळं कुटुंबातील सदस्यांनी एकत्र राहावं यासाठी डिझाइन केलं आहे. जेवण बनवणारी व्यक्ती वेगळी पडू नये, हा या रचनेमागे मुख्य हेतू असल्याचं वांगचुक सांगतात. इतकंच नाही, तर घरात पाणीविरहित टॉयलेटची सोय असून, मानवी विष्ठेचं खतात रूपांतर करणारी पर्यावरणपूरक पद्धतही वापरली आहे.
55
लडाखची वास्तुकला
Image Credit : Instagram

लडाखची वास्तुकला

सोनम वांगचुक त्यांच्या उपोषणामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले असले तरी, त्यांचं 'ट्रायबल हाऊस' हे पर्यावरणपूरकता, परंपरा आणि नावीन्य यांचा संगम साधणारं एक उत्तम उदाहरण आहे. यासाठी वास्तुकलातज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सातत्याने त्यांचं कौतुक करत आहेत.

'दारु'शौकिनांसाठी खुशखबर! बारच्या नियमांमध्ये मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

About the Author

JP
Jaywant Patil
जयवंत पाटील हे मुंबईत नामांकित संस्थेत काम केलेले अनुभवी पत्रकार आहेत. वेबसाईट - मोबाईल न्यूज, सोशल मीडियाचे ते अनुभवातून अभ्यासक आहेत. संपूर्ण 18 वर्षांचं करिअर त्यांचं डिजिटल न्यूज- व्हीडिओ या माध्यमात गेलं आहे. ABP माझा, ZEE 24 तास, Letsupp मराठी, TV 9 मराठी अशा वेबसाईटचे संपादकपद भूषवले आहे. सोशल मिडिया एक्सपोर्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते शेती या विषयावर देखील लिखाण करतात.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Purity Test : सोनं, चांदी, केसर खरं की खोटं? घरातल्या घरात ओळखण्याच्या सोप्या टिप्स
Recommended image2
Car Loan : डाऊन पेमेंटशिवाय गाडी घेताय? थांबा, आधी हे धोके जाणून घ्या
Recommended image3
Work From Home : ऑफिसमध्ये बसून जास्त काम होतं हा गैरसमज; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
Crash Test : लाखोंच्या गाड्यांचं सेफ्टी टेस्टनंतर काय होतं? उत्तर इथे मिळेल!
Recommended image5
रात्री फोन वापरता? मग डोळ्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 'ही' एक सेटिंग बदला!
Related Stories
Recommended image1
लेह-लडाख: प्रवाशांसाठी आवर्जून भेट द्यावी अशी ठिकाणे
Recommended image2
Travel Guide: साहसी असाल तर लडाख, शांतता हवी असल्यास तवांग... मूडनुसार फिरा या ठिकाणी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved