Seema Anand Slams : सीमा आनंद सध्या चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित त्यांचे न*ग्न फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.

अलिकडच्या काळात सोशल मीडियावर एक नाव वेगाने व्हायरल होत आहे. हे नाव कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीचे नसून, एका ६३ वर्षीय महिलेचे आहे. ती महिला दुसरी कोणी नसून, लैंगिक शिक्षणतज्ज्ञ, लेखिका आणि कंटेंट क्रिएटर सीमा आनंद आहेत. काही दिवसांपूर्वी शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये सीमा यांनी त्यांच्या आयुष्यातील काही न उलगडलेल्या गोष्टींबद्दल सांगितले होते. ज्यामुळे त्या अनेकांच्या नजरेत आल्या. यासाठी त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्यांचे अनेक फोटो मॉर्फ आणि एडिटही करण्यात आले आहेत.

सीमा आनंद सध्या चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित त्यांचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. आता सीमा आनंद यांनी यावर आपला संताप व्यक्त केला आहे. तरुणांना हस्तमैथुन करण्यासाठी माझ्या नग्नतेची गरज आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

बलात्कारी मानसिकता : सीमा आनंद यांनी केली टीका 

लैंगिक शिक्षणतज्ज्ञ सीमा आनंद यांचे काही AI आधारित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लोकांनी या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या होत्या. आता त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. सीमा यांनी या प्रकरणावर आपला संताप व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 'आता लोकांना हस्तमैथुन करण्यासाठी ६३ वर्षांच्या महिलेच्या नग्नतेची गरज आहे'. इतकेच नाही, तर अशा लोकांच्या विचारांना त्यांनी 'बलात्कारी मानसिकता' म्हटले आहे.

सीमा आनंद यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी सांगितले की या फोटोंमुळे त्यांना किती त्रास झाला आहे. याशिवाय, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फोटो नाहीत, तर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आहेत, असेही त्या म्हणाल्या. काही लोकांनी "हा फोटो इतका वाईट नाही" असे म्हटले. तरीही, त्याबद्दल विचार करणेही मला किळसवाणे वाटते, असे त्यांनी सांगितले.

View post on Instagram

अनेक समस्यांना सामोऱ्या जात आहेत सीमा आनंद

सीमा आनंद यांनी या संपूर्ण विचारसरणीला "बलात्कारी मानसिकता" म्हटले आहे. आजही समाजात अशी कल्पना आहे की, जर एखाद्या महिलेने विशिष्ट प्रकारचे कपडे घातले तर ती काहीतरी चुकीचे संकेत देत आहे. साडी नेसलेल्या महिलेचा फोटो काढून तिला शॉर्ट्समध्ये दाखवले, तर काही लोकांना वाटते की ते तिच्यासोबत काहीही करू शकतात. मी माझ्या स्वतःच्या इच्छेने शॉर्ट्स घातले तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिडिओमध्ये सीमा आनंद यांनी देशातील तरुणांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आज अनेक तरुण आपली नोकरी, छंद आणि सर्जनशीलता सोडून डिजिटल प्लॅटफॉर्मवर घरात बसून नग्न चित्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्या म्हणाल्या. "हस्तमैथुन करण्यासाठी तुम्हाला माझ्या नग्नतेची गरज आहे का? माझे वय ६३ वर्षे आहे," असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. सीमा आनंद नाती आणि जवळीक यावर मोकळेपणाने बोलतात. इतकेच नाही, तर ज्या विषयावर लोक उघडपणे बोलत नाहीत, त्याबद्दल त्या आपल्या कथांमधून शिक्षण देतात. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.