- Home
- Utility News
- SBI Recruitment 2026 : बँकेत सरकारी नोकरीची मोठी संधी! स्टेट बँक ऑफ इंडियात बंपर भरती, मिळू शकते तब्बल 80 लाखांचे पॅकेज
SBI Recruitment 2026 : बँकेत सरकारी नोकरीची मोठी संधी! स्टेट बँक ऑफ इंडियात बंपर भरती, मिळू शकते तब्बल 80 लाखांचे पॅकेज
SBI Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियाने अनुभवी व्यावसायिकांसाठी स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांची भरती जाहीर केली. यासाठी बँकिंग, आयटी किंवा ई-कॉमर्समध्ये किमान 15 वर्षांचा अनुभव आवश्यक असून, उमेदवारांना वार्षिक ₹40 लाख ते ₹80 लाखांचे पॅकेज मिळणारय

स्टेट बँक ऑफ इंडियात बंपर भरती
SBI Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बँकिंग किंवा आयटी क्षेत्रात भक्कम अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून एक मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या SBI ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती अनुभवी आणि पात्र व्यावसायिकांसाठी करिअरला नवी उंची देणारी ठरणार आहे.
या भरतीअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीधर असणे आवश्यक असून, बँकिंग, ई-कॉमर्स किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील किमान 15 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदारांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे अशी अट घालण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया आणि नियुक्तीचा कालावधी
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखत या दोन टप्प्यांतून केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 5 वर्षांच्या कंत्राटी स्वरूपात करण्यात येणार आहे.
वेतन आणि पॅकेजची माहिती
या भरतीचे विशेष आकर्षण म्हणजे उच्च वेतन संरचना.
वरिष्ठ पदांसाठी वार्षिक पॅकेज ₹40 लाख ते ₹80 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
तर डेप्युटी मॅनेजर स्तरावरील पदांसाठी मासिक वेतन ₹64,820 ते ₹93,960 इतके असणार आहे.
करिअरसाठी सुवर्णसंधी
एकूणच, बँकिंग, आयटी किंवा ई-कॉमर्स क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या व्यावसायिकांसाठी SBI मधील ही भरती एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची संधी मानली जात आहे. सरकारी बँकेतील सुरक्षित नोकरी, उच्च वेतन आणि जबाबदारीचे पद यामुळे ही भरती अनेकांसाठी करिअर टर्निंग पॉइंट ठरू शकते.

