- Home
- Utility News
- SBI Credit Card : SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल!, 1 सप्टेंबरपासून 'या' सुविधा होणार बंद
SBI Credit Card : SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल!, 1 सप्टेंबरपासून 'या' सुविधा होणार बंद
SBI Credit Card : 1 सप्टेंबर 2025 पासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. काही विशिष्ट कार्डांवर मिळणारे रिवॉर्ड्स बंद केले जाणार आहेत आणि CPP कार्ड सुरक्षा योजना आपोआप अपडेटेड प्लॅन वेरिएंटमध्ये ट्रान्सफर होईल.

नवी दिल्ली : एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार असून, अनेक फायदे आता बंद करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांमुळे अनेक कार्डधारकांच्या रिवॉर्ड पॉइंट्ससंबंधीच्या अपेक्षांना झटका बसू शकतो.
एसबीआय कार्डने अलीकडेच जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, काही विशिष्ट कार्डांवर मिळणारे रिवॉर्ड्स बंद केले जाणार आहेत. यामध्ये Lifestyle Home Centre SBI Card, Lifestyle Home Centre SBI Card Select आणि Lifestyle Home Centre SBI Card Prime यांचा समावेश आहे. या कार्डांवर यापुढे काही व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत.
कुठल्या व्यवहारांवर होणार रिवॉर्ड पॉइंट बंद?
1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार खालील व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत:
ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवरील व्यवहार
सरकारी सेवा संबंधित व्यवहार (Government Services)
हे निर्बंध मर्चंट ट्रान्झॅक्शनस (Merchant Transactions) साठी देखील लागू राहतील.
CPP (Card Protection Plan) संदर्भातही महत्त्वाचा बदल
16 सप्टेंबर 2025 पासून CPP कार्ड सुरक्षा योजना आपोआप अपडेटेड प्लॅन वेरिएंटमध्ये ट्रान्सफर होईल. हा ट्रान्स्फर ग्राहकाच्या ऑटो-रिन्युअल डेटच्या आधारे केला जाईल. याची माहिती एसबीआय कार्डकडून एसएमएस आणि ईमेलद्वारे रिन्युअलच्या 24 तास आधी दिली जाईल.
याआधीही झालेत महत्त्वाचे बदल
गेल्या काही महिन्यांपासून एसबीआय कार्डने नियमांमध्ये सातत्यानं बदल केले आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये काही क्रेडिट कार्ड्सवरील कॉम्प्लिमेंटरी हवाई अपघात विमा (Air Accident Cover) रद्द करण्यात आला. याअंतर्गत 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा मिळत होता. हे बदल SBI Elite आणि SBI Prime कार्डांवर लागू झाले होते.

