जबरदस्त ऑफर! सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 6 मिळतोय इतक्या कमी किंमतीत
सॅमसंगचा सर्वात प्रीमियम मॉडेल 'गॅलेक्सी Z फोल्ड 6' (Galaxy Z Fold 6) खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत पहिल्यांदाच इतकी कमी झाली आहे.

सॅमसंग प्रेमींसाठी जॅकपॉट बातमी -
सॅमसंगचा सर्वात प्रीमियम मॉडेल 'गॅलेक्सी Z फोल्ड 6' (Galaxy Z Fold 6) खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत पहिल्यांदाच इतकी कमी झाली आहे. 2024 मध्ये लाँच झालेला हा फ्लॅगशिप फोन, आता त्याच्या लाँच किंमतीपेक्षा सुमारे 61,000 रुपयांनी कमी किंमतीत उपलब्ध आहे.
फ्लिपकार्टवर ऑफर्सचा पाऊस -
सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 6 स्मार्टफोन भारतात लाँच झाला तेव्हा त्याची सुरुवातीची किंमत 1,64,999 रुपये होती. पण, आता प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टने (Flipkart) या फोनवर 61,066 रुपयांची मोठी सूट जाहीर केली आहे. त्यामुळे, हा प्रीमियम फोन आता फक्त 1,03,933 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सॅमसंगच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी संधी आहे.
जास्त बचतीसाठी बँक आणि एक्सचेंज ऑफर्स -
थेट डिस्काउंट व्यतिरिक्त, ग्राहक अतिरिक्त ऑफर्सचाही लाभ घेऊ शकतात. तुमच्याकडे फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक (Flipkart Axis Bank) क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्ही अतिरिक्त 5 टक्के बचत करू शकता. तसेच, तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज (Exchange) करून तुम्ही 68,050 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. ही रक्कम तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
स्क्रीन आणि प्रोसेसर कसे आहेत -
किंमत कमी झाली असली तरी, त्याच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड नाही. गॅलेक्सी Z फोल्ड 6 हा बाजारातील सर्वात शक्तिशाली फोल्डेबल फोनपैकी एक आहे. यात 7.6-इंचाचा डायनॅमिक एमोलेड 2X मुख्य डिस्प्ले आणि 6.3-इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. दोन्ही 120Hz रिफ्रेश रेटसह येतात. तसेच, हा फोन वेगवान कामगिरीसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 (Snapdragon 8 Gen 3) चिपसेटसह येतो. यात 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे.
कॅमेरा आणि बॅटरीची माहिती -
फोटो काढण्यासाठी, यात 50-मेगापिक्सल (OIS) मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10-मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4400mAh ची बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकते. तसेच, हे 45W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

