Renault Triber : फक्त सात लाख रुपयांत सात सीटर कार, सेफ्टीसोबत जबरदस्त फीचर्स...
Renault Triber : भारतीय बाजारात 7 सीटर कारला मोठी मागणी आहे. साधारणपणे 7 सीटर कारच्या किमती जास्त असतात. पण महिंद्रा, टाटा, ह्युंदाई आणि टोयोटा या ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी रेनॉल्टने आणलेली कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जाणून घेऊया तिची माहिती

किंमत 6.88 लाखांपासून सुरू
रेनॉल्ट ट्रायबरची सुरुवातीची किंमत 6.88 लाख रुपये (ऑन-रोड) आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 10.18 लाख रुपये आहे. एकूण 11 व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि CNG पर्याय आहेत. मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्यायही मिळतात.
व्हेरिएंटनुसार किमती
ट्रायबर ऑथेंटिक – 6.88 लाख रुपये
ट्रायबर ऑथेंटिक CNG – 7.67 लाख रुपये
ट्रायबर इव्होल्यूशन – 7.89 लाख रुपये
ट्रायबर इव्होल्यूशन CNG – 8.68 लाख रुपये
ट्रायबर टेक्नो – 8.69 लाख रुपये
ट्रायबर इमोशन – 9.38 लाख रुपये
ट्रायबर टेक्नो CNG – 9.48 लाख रुपये
ट्रायबर इमोशन ड्युअल टोन – 9.62 लाख रुपये
ट्रायबर इमोशन AMT – 9.93 लाख रुपये
ट्रायबर इमोशन CNG – 10.17 लाख रुपये
ट्रायबर इमोशन AMT Dual Tone – 10.18 लाख रुपये
इंजिन क्षमता – 999cc पेट्रोल युनिट
या कारमध्ये 999 सीसी पेट्रोल इंजिन आहे. हे 71 BHP पॉवर आणि 96 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 5 गिअर्ससह येते. सिटी ड्रायव्हिंग आणि हायवे प्रवासासाठी योग्य ट्युनिंग आहे.
मायलेज किती देते?
शहरी भागात पेट्रोलवर सरासरी 13.64 किमी मायलेज देते. हायवेवर 17.86 किमीपर्यंत मायलेज मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. केबिन डिझाइन आरामदायक आहे. स्टीयरिंग कंट्रोल हलके असल्याने नवीन ड्रायव्हर्सनाही ती चालवणे सोपे जाते.
सुरक्षा फीचर्स – 4 स्टार रेटिंग
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 6 एअरबॅग्ज आहेत. ABS आणि EBD सिस्टीम आहे. रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत. ESP आणि ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधा दिली आहे. NCAP ने या कारला 4-स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. ही कार पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. मारुती एर्टिगा, रेनॉल्ट कायगर आणि निसान मॅग्नाइट या गाड्यांना ती जोरदार टक्कर देते.

