MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • RBI FD Rules : बँकेत फिक्स डिपॉझिट केलंय का? नियम बदललेत, लगेच वाचा

RBI FD Rules : बँकेत फिक्स डिपॉझिट केलंय का? नियम बदललेत, लगेच वाचा

बँकेत फिक्स डिपॉझिट (FD) करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एफडीच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. बँक ग्राहकांनी हे नवीन नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 03 2026, 05:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
फिक्स डिपॉझिट (FD)
Image Credit : our own

फिक्स डिपॉझिट (FD)

सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यासाठी अनेकजण बँकेत फिक्स डिपॉझिट (FD) करतात. आता १ ऑक्टोबर २०२६ पासून मोठ्या रकमेच्या एफडीसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नव्या नियमांनुसार, व्यावसायिक बँकांमध्ये ३ कोटी रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या सिंगल रुपी टर्म डिपॉझिटला 'बल्क डिपॉझिट' (मोठी ठेव) मानले जाईल. या बदलाचा मुख्य उद्देश व्याजदरांमध्ये पारदर्शकता आणणे हा आहे. यासाठी बँकांना आता दररोज सकाळी त्यांच्या वेबसाईटवर बल्क डिपॉझिटचे व्याजदर जाहीर करावे लागतील.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय आहे नवा नियम?
Image Credit : ChatGPT

काय आहे नवा नियम?

नव्या नियमानुसार, बँकांना बल्क डिपॉझिटचे व्याजदर सकाळी १० वाजता जाहीर करावे लागतील. वेबसाईट अपडेट करण्यासाठी १० मिनिटांचा वेळ दिला आहे, म्हणजेच जास्तीत जास्त १०:१० पर्यंत व्याजदर दिसणे बंधनकारक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकाच दिवशी स्वीकारलेल्या समान रकमेच्या बल्क डिपॉझिटवर बँकेच्या सर्व शाखांमध्ये एकच व्याजदर दिला पाहिजे. ग्राहक कोणत्याही शाखेत गेला तरी त्याला समान रकमेसाठी तोच व्याजदर मिळेल, याची खात्री या नियमामुळे झाली आहे.

Related Articles

Related image1
Loan App Scam : 5 मिनिटांत कर्ज? हव्यासापोटी ॲप इन्स्टॉल कराल तर आयुष्य उद्ध्वस्त होईल
35
एकच व्याजदर
Image Credit : freepik

एकच व्याजदर

बँकांनी सर्वच बल्क डिपॉझिटसाठी एकच व्याजदर द्यावा, असे कोणतेही बंधन नाही. काही विशिष्ट बल्क डिपॉझिट्सवर वेगवेगळे व्याजदर देण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली आहे. हे नवीन नियम फक्त व्यावसायिक बँकांनाच नाही, तर स्मॉल फायनान्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लोकल एरिया बँका, पेमेंट बँका आणि नागरी सहकारी बँकांनाही लागू होणार आहेत.

45
नियमांचा थेट परिणाम नाही
Image Credit : our own

नियमांचा थेट परिणाम नाही

सामान्य एफडी ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर या नव्या नियमांचा थेट परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, जर तुमची १ लाख, ५ लाख किंवा २५ लाखांची एफडी असेल, तर तुमच्यासाठी काहीही बदलणार नाही. फक्त ३ कोटी किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांनीच बँकेच्या वेबसाईटवर रोजचे व्याजदर तपासणे गरजेचे आहे.

55
१ ऑक्टोबरपासून नियम लागू
Image Credit : our own

१ ऑक्टोबरपासून नियम लागू

१ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या या नियमांचा अर्थ असा नाही की सर्वांचे व्याजदर बदलले आहेत. हा नियम प्रामुख्याने मोठ्या रकमेच्या एफडीचे व्याजदर ठरवण्यासाठी आणि ते पारदर्शकपणे जाहीर करण्यासाठी आहे. तुम्ही ३ कोटी किंवा त्याहून अधिक रकमेची एफडी करणार असाल, तर आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर त्या दिवसाचा व्याजदर तपासा आणि नोंदवून ठेवा. नंतर एफडी पावतीवर दिलेल्या व्याजदरासोबत तुम्ही त्याची तुलना करू शकता. यामुळे मोठ्या रकमेची गुंतवणूक करताना ग्राहकांना अधिक स्पष्टता मिळेल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Samsung Galaxy S27: सॅमसंग गॅलेक्सी S27 मध्ये येणार Exynos 2700 चिपसेट, काय आहेत फीचर्स?
Recommended image2
Loan App Scam : 5 मिनिटांत कर्ज? हव्यासापोटी ॲप इन्स्टॉल कराल तर आयुष्य उद्ध्वस्त होईल
Recommended image3
Flipkart Big Billion Days : फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंगच्या फोन्सवर बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर्स
Recommended image4
AI Revolution: भारताची पुढची मोठी क्रांती! योग्य चिप्सच यशाचं रहस्य - राजीव चंद्रशेखर
Recommended image5
Eye Glass Care: चष्मा पुसताना या ५ चुका टाळा, नाहीतर लेन्स खराब होईल आणि नंबर वाढेल
Related Stories
Recommended image1
Loan App Scam : 5 मिनिटांत कर्ज? हव्यासापोटी ॲप इन्स्टॉल कराल तर आयुष्य उद्ध्वस्त होईल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved