MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Railway Ticket: रेल्वे तिकीट स्टेशनवरून नाही, आता पोस्ट ऑफिसमधून! काही मिनिटांत बुक करा; अनेकांना माहित नसलेली नवी सोय

Railway Ticket: रेल्वे तिकीट स्टेशनवरून नाही, आता पोस्ट ऑफिसमधून! काही मिनिटांत बुक करा; अनेकांना माहित नसलेली नवी सोय

Railway Ticket: भारतीय पोस्ट विभाग आणि रेल्वेने मिळून प्रवाशांना पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा सुरू केली. पुणे जिल्ह्यात सुरू झालेल्या या सेवेमुळे प्रवाशांना स्टेशनवरील रांगेचा त्रास टाळून जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट काढता येणारय.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 28 2025, 03:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
आता पोस्टातूनच मिळणार तिकीट
Image Credit : our own

आता पोस्टातूनच मिळणार तिकीट

पुणे: रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. आता रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी स्टेशनवर रांगेत उभं राहायचं त्रासदायक काम नाही, आणि ऑनलाइन बुकिंगसाठी इंटरनेटची झगमगही नाही! भारतीय पोस्ट विभागाने रेल्वेसोबत हातमिळवणी करून प्रवाशांना थेट पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
पुणे जिल्ह्यातील अनेक पोस्ट कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू
Image Credit : ANI

पुणे जिल्ह्यातील अनेक पोस्ट कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू

ही सोय सध्या पुणे जिल्ह्यातील अनेक पोस्ट कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आली असून, लवकरच इतर भागातही ती सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्याची गरज राहणार नाही आता तिकीट मिळणार थेट आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून! 

Related Articles

Related image1
PM Kisan 21st Installment Alert : हे 5 प्रकारचे शेतकरी 21 व्या हप्त्यापासून राहू शकतात वंचित!
Related image2
Password Leaked : काय सांगता! 183 कोटी ईमेल पासवर्ड लीक, तुमचा पण चोरीला गेलाय? असे तपासून पहा
36
तिकीट बुकिंगची सोपी प्रक्रिया
Image Credit : Google

तिकीट बुकिंगची सोपी प्रक्रिया

पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वेच्या ‘पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम’ (PRS) द्वारे प्रवाशांना सहज तिकीट बुक करता येईल. प्रवाशांनी केवळ आपलं गंतव्य, प्रवासाची तारीख आणि वर्ग सांगायचा आहे. पोस्ट ऑफिसमधील प्रशिक्षित कर्मचारी संगणकाद्वारे आरक्षण करून तिकीट तत्काळ देतील. तसंच, तिकीट रद्द करणे, बदल करणे, चौकशी करणे यांसारख्या सर्व सुविधा इथेच मिळतील म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सेवा! 

46
ग्रामीण भागासाठी मोठा दिलासा
Image Credit : eRail.in

ग्रामीण भागासाठी मोठा दिलासा

पूर्वी ग्रामीण भागातील प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या रेल्वे स्थानकावर जावं लागायचं. वेळ, प्रवासाचा खर्च आणि त्रास हे सगळं आता संपणार आहे. पोस्ट ऑफिसमध्येच ही सुविधा मिळाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. 

56
२४ तास बुकिंग सेवा, रात्रीसुद्धा मिळेल तिकीट!
Image Credit : our own

२४ तास बुकिंग सेवा, रात्रीसुद्धा मिळेल तिकीट!

काही निवडक पोस्ट कार्यालयांत २४ तास बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीच्या प्रवासासाठीही कुठल्याही वेळी तिकीट मिळू शकतं. ही योजना रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यास आणि प्रवाशांना घराजवळच आरक्षणाची सोय देण्यासाठी खास उपयुक्त ठरणार आहे. 

66
रेल्वे प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित
Image Credit : iSTOCK

रेल्वे प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित

रेल्वे प्रशासन आणि पोस्ट विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेली ही नवी सेवा प्रवाशांसाठी खरोखरच लाभदायक आहे. आता प्रवासाचं नियोजन अधिक सोयीस्कर, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. कारण रेल्वे तिकीट मिळेल थेट आपल्या पोस्ट ऑफिसमध्येच!

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(12.2 ov)20/2
AUSAUS
-
Day 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Gold Colour : सोनं नेहमी पिवळ्या रंगाचं का असतं? यामागचं विज्ञान माहितीये का?
Recommended image2
Besan Face Packs: चमकदार त्वचेसाठी बेसनाचे हे ३ फेसपॅक नक्की ट्राय करा
Recommended image3
Post Office vs Bank FD : 1 लाख गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त व्याज? पोस्ट ऑफिस की बँक?
Recommended image4
Renault Duster Hybrid : रेनॉल्टने ही नवीन डस्टर मार्केटमध्ये, भन्नाट फीचर्स-बंपर मायलेज; चार्जरची गरजच नाही
Recommended image5
Hero Xtreme 160R 4V : महागड्या बाईक्सना टक्कर देतेय ही नवी बाईक, फीचर्स एकदम कडक; किंमत किती?
Related Stories
Recommended image1
PM Kisan 21st Installment Alert : हे 5 प्रकारचे शेतकरी 21 व्या हप्त्यापासून राहू शकतात वंचित!
Recommended image2
Password Leaked : काय सांगता! 183 कोटी ईमेल पासवर्ड लीक, तुमचा पण चोरीला गेलाय? असे तपासून पहा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved