MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Price Vs Cost : 'प्राईस' आणि 'कॉस्ट' दोन्हीचा अर्थ किंमतच, पण फरक माहितीये का?

Price Vs Cost : 'प्राईस' आणि 'कॉस्ट' दोन्हीचा अर्थ किंमतच, पण फरक माहितीये का?

'प्राईस' (Price) आणि 'कॉस्ट' (Cost) हे दोन्ही शब्द आपण रोज वापरतो. अनेकांना वाटतं की या दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण बिझनेस आणि व्यवहारात या दोन्ही शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. तोच फरक आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 01 2026, 08:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Price Vs Cost
Image Credit : Gemini AI

Price Vs Cost

आपण रोजच्या जीवनात अनेक वस्तू विकत घेतो. या वस्तूंबद्दल बोलताना आपण 'प्राईस' (Price) आणि 'कॉस्ट' (Cost) हे दोन इंग्रजी शब्द नेहमी वापरतो. मराठीत या दोन्ही शब्दांचा अर्थ साधारणपणे 'किंमत' असाच होतो. त्यामुळे अनेकांना हे दोन्ही शब्द एकच वाटतात. पण इंग्रजीत या शब्दांचा अर्थ आणि वापरण्याची वेळ पूर्णपणे वेगळी असते. विशेषतः बिझनेस, खरेदी आणि उत्पादनाच्या बाबतीत प्राईस आणि कॉस्ट मधला फरक खूप महत्त्वाचा ठरतो.

सोप्या भाषेत सांगायचं तर, एखादी वस्तू विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी जी रक्कम ठरवली जाते, तिला 'प्राईस' म्हणतात. आणि तीच वस्तू तयार करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी जो खर्च येतो, त्याला 'कॉस्ट' म्हणतात. हाच फरक आपण काही सोप्या उदाहरणांमधून समजून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
Price म्हणजे काय?
Image Credit : Gemini AI

Price म्हणजे काय?

आपण जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेतो आणि त्यासाठी जे पैसे देतो, त्याला प्राईस म्हणतात. म्हणजेच, मार्केटमध्ये एखाद्या वस्तूवर जी विक्री किंमत छापलेली असते, ती त्या वस्तूची प्राईस असते.

समजा, एका दुकानात शर्टची किंमत १००० रुपये आहे. तो शर्ट विकत घेणारा माणूस १००० रुपये देतो. इथे १००० रुपये ही त्या शर्टची 'प्राईस' झाली.

त्याचप्रमाणे, एखाद्या हॉटेलमध्ये जेवणाचे बिल ५०० रुपये आले, तर ती त्या जेवणाची प्राईस असते. सिनेमाचे तिकीट २५० रुपये असेल, तर प्रेक्षकांसाठी ती तिकीट प्राईस असते.

थोडक्यात, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्राईस समजायला खूप सोपी आहे.

Related Articles

Related image1
Online Offer : ॲमेझॉन-फ्लिपकार्ट सेलमध्ये अशी करा खरेदी, दिवाळी बोनसइतकी होईल बचत
34
Cost म्हणजे काय?
Image Credit : Gemini AI

Cost म्हणजे काय?

एखादी वस्तू बनवण्यासाठी कंपनीला जो एकूण खर्च येतो, त्याला कॉस्ट म्हणतात. उदाहरणार्थ, शर्ट बनवणाऱ्या कंपनीला कापड, शिलाई, कामगारांचा पगार, वीज, पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट या सगळ्यासाठी खर्च येतो. हा सगळा खर्च मिळून त्या शर्टची 'कॉस्ट' ठरते.

समजा, एक शर्ट तयार करून दुकानात पाठवेपर्यंत कंपनीला ७०० रुपये खर्च आला. आणि तोच शर्ट मार्केटमध्ये १००० रुपयांना विकला गेला. तर इथे ७०० रुपये ही कंपनीसाठी 'कॉस्ट' झाली आणि १००० रुपये ही ग्राहकासाठी 'प्राईस' झाली. इथेच या दोन शब्दांमधला मुख्य फरक स्पष्ट होतो.

एकाच वस्तूला प्राईस आणि कॉस्ट का असते?

समजा, एका कंपनीला मोबाईल बनवण्यासाठी १२,००० रुपये खर्च आला. कंपनीने तोच मोबाईल १५,००० रुपयांना विकला. इथे १२,००० रुपये ही त्याची कॉस्ट (बनवण्याचा खर्च) आहे आणि १५,००० रुपये ही त्याची सेलिंग प्राईस (विक्री किंमत) आहे.

यातील ३,००० रुपयांच्या फरकामध्ये कंपनीचा नफा, टॅक्स आणि मार्केटिंगचा खर्च समाविष्ट असतो.

44
Price कुणावर अवलंबून असते?
Image Credit : AI

Price कुणावर अवलंबून असते?

प्राईस ही मुख्यत्वे विक्रीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. एकच वस्तू वेगवेगळ्या दुकानात, वेगवेगळ्या वेळी किंवा ऑफरमध्ये वेगवेगळ्या प्राईसला मिळू शकते. समजा, एका दुकानात बुटांची किंमत २००० रुपये आहे. तेच बूट दुसरं दुकान डिस्काउंट देऊन १७०० रुपयांना विकू शकतं. इथे कंपनीचा बूट बनवण्याचा खर्च (Cost) बदलत नाही, पण ग्राहकाने दिलेली किंमत (Price) बदलते. डिमांड, सप्लाय आणि ब्रँड व्हॅल्यू या गोष्टी प्राईसवर परिणाम करतात.

कॉस्ट म्हणजे फक्त कच्च्या मालाचा खर्च नाही

हॉटेलमध्ये एक प्लेट बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ, मटण, मसाले यासोबतच आचारीचा पगार, वीज, गॅस, भाडे आणि पॅकिंगचा खर्चही लागतो. या सगळ्या खर्चावर कॉस्ट ठरते.

प्राईस जास्त म्हणजे नफा जास्त असं असतं का?

असं अजिबात नसतं. एखादी वस्तू १०,००० रुपयांना विकली, म्हणजे कंपनीला १०,००० रुपये नफा झाला असं होत नाही. जर ती वस्तू बनवायला ९,००० रुपये खर्च (Cost) आला असेल, तर कंपनीला फक्त १००० रुपये नफा मिळतो. म्हणूनच फक्त प्राईस बघून कंपनीचा नफा ठरवता येत नाही.

ग्राहकासाठी प्राईस.. बिझनेससाठी कॉस्ट

हे लक्षात ठेवायला एक सोपी पद्धत आहे.

प्राईस = ग्राहक जी रक्कम देतो ती.

कॉस्ट = वस्तू बनवण्यासाठी जो खर्च येतो तो.

कॉस्ट प्राईस (Cost Price) म्हणजे काय?

गणितात आपण कॉस्ट प्राईस (CP) आणि सेलिंग प्राईस (SP) शिकतो. दुकानदाराने ८०० रुपयांना बॅग विकत घेतली आणि १००० रुपयांना विकली. इथे ८०० रुपये कॉस्ट प्राईस आणि १००० रुपये सेलिंग प्राईस आहे. फरक २०० रुपये आहे.

थोडक्यात लक्षात ठेवा

मराठीत आपण दोन्हीला 'किंमत' म्हणत असलो तरी इंग्रजीत त्यांचा वापर वेगळा आहे. तुम्ही जी रक्कम देता ती 'प्राईस' आणि वस्तू बनवण्यासाठी जो खर्च येतो ती 'कॉस्ट'.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
UPI Transaction Fees: युपीआय व्यवहारांवर शुल्क लागल्याने फटका? व्यवहारांमध्ये घट
Recommended image2
Gold Investment : दागिन्यांव्यतिरिक्त सोन्यात गुंतवणूक करण्याचे 7 भन्नाट पर्याय
Recommended image3
Commercial LPG Price Hike : सणासुदीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांचे टेन्शन वाढले
Recommended image4
Best Investment Options: गुंतवणुकीची सुरुवात नेमकी कुठून करायची?
Recommended image5
Business Location : कोणता व्यवसाय कुठे सुरू करावा? जाणून घ्या योग्य जागा
Related Stories
Recommended image1
Online Offer : ॲमेझॉन-फ्लिपकार्ट सेलमध्ये अशी करा खरेदी, दिवाळी बोनसइतकी होईल बचत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved