MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Post Office RD Scheme : रोज फक्त 300 रुपये वाचवा, 5 वर्षांत मिळवा 6.42 लाख

Post Office RD Scheme : रोज फक्त 300 रुपये वाचवा, 5 वर्षांत मिळवा 6.42 लाख

तुम्हाला कोणत्याही रिस्कशिवाय खात्रीशीर परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसची ५ वर्षांची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही रोज फक्त ३०० रुपये बाजूला काढले, तर मॅच्युरिटीला तुमच्या हातात तब्बल ६.४२ लाख रुपये येतील.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 05 2026, 05:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पोस्ट ऑफिसची सुपर स्कीम: महिन्याला ९००० गुंतवा, लाखांत परतावा मिळवा
Image Credit : Chatgpt

पोस्ट ऑफिसची सुपर स्कीम: महिन्याला ९००० गुंतवा, लाखांत परतावा मिळवा

आपण दर महिन्याला केलेली छोटी बचत भविष्यात खूप कामी येते. तुम्ही योग्य ठिकाणी पैसे गुंतवले, तर काही वर्षांतच एक मोठा फंड तयार होतो. तुम्ही रोज ३०० रुपये वाचवले, तर महिन्याला ९,००० रुपये जमा होतात. हे पैसे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेत गुंतवले, तर मॅच्युरिटीला तुमच्याकडे ६.४२ लाख रुपयांचा मोठा फंड तयार होईल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
५ वर्षांत किती पैसे जमा होतील?
Image Credit : Asianet News

५ वर्षांत किती पैसे जमा होतील?

पोस्ट ऑफिस RD मध्ये तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. सध्या ५ वर्षांच्या RD वर वार्षिक ६.७ टक्के व्याज मिळत आहे. यात दर तिमाहीला चक्रवाढ पद्धतीने व्याज मोजले जाते.

तुम्ही दर महिन्याला ९,००० रुपये जमा केल्यास, कॅल्क्युलेशन असे असेल:

• मासिक गुंतवणूक: ९,००० रुपये

• कालावधी: ५ वर्षे (६० महिने)

• एकूण गुंतवणूक: ९,००० × ६० = ५,४०,००० रुपये

• व्याजदर: वार्षिक ६.७%

• अंदाजित व्याज: १,०२,२९२ रुपये

• मॅच्युरिटी रक्कम: ६,४२,२९२ रुपये

म्हणजेच ५ वर्षांत तुमची मूळ गुंतवणूक ५.४० लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला १.०२ लाख रुपये व्याज मिळेल.

Related Articles

Related image1
UPI Budget Usage : UPI वर एक क्लिक आणि खिसा रिकामा... तुम्हालाही आहे का ही सवय?
35
रोज ३०० रुपये वाचवण्याचा अर्थ काय?
Image Credit : iSTOCK

रोज ३०० रुपये वाचवण्याचा अर्थ काय?

तुम्ही रोज ३०० रुपये वाचवले, तर महिन्याकाठी ते ९,००० रुपये होतात. पण RD मध्ये रोज पैसे जमा करावे लागत नाहीत. तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक हप्ता भरावा लागतो. त्यामुळे रोज ३०० रुपये वाचवण्याचे टार्गेट ठेवा आणि महिन्याच्या शेवटी ९,००० रुपये RD मध्ये जमा करा.

45
किती रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते?
Image Credit : Chatgpt

किती रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते?

पोस्ट ऑफिस RD मध्ये तुम्ही अगदी छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता. सरकारी नियमांनुसार, तुम्ही महिन्याला किमान १०० रुपये जमा करून खाते उघडू शकता. त्यानंतर तुम्ही १० रुपयांच्या पटीत रक्कम वाढवू शकता. यात जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. गरज पडल्यास तुम्ही तो पुढे वाढवूही शकता.

55
पैशांची पूर्ण सुरक्षितता, पण अटी लागू
Image Credit : Getty

पैशांची पूर्ण सुरक्षितता, पण अटी लागू

पोस्ट ऑफिस RD ही सरकारची अल्पबचत योजना आहे. केंद्र सरकार ही योजना चालवते. त्यामुळे शेअर बाजारातील रिस्क न घेता खात्रीशीर व्याज आणि सुरक्षित गुंतवणूक हवी असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ६.७ टक्के व्याजदर कायमस्वरूपी नसतो. सरकार दर तिमाहीला अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेते. त्यामुळे नवीन खाते उघडताना सध्याचा व्याजदर नक्की तपासून पाहा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(49.0 ov)110/5
AUSAUS
-
Day 3 - Session 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Festive Shopping EMI : सणासुदीला ईएमआयवर खरेदी करताय? खिशाला कात्री लागू देऊ नका
Recommended image2
Best Mobile Under 15000 : 15 हजारांत सुपर 5G मोबाईल, नवा फोन घेणाऱ्यांसाठी बेस्ट ऑफर
Recommended image3
Post Office SCSS : रिटायरमेंटनंतर दरमहा 10000 हून अधिक कमवा, सरकारची योजना नेमकी काय? फायदे काय?
Recommended image4
iPhone 17 Discount : 99 हजारांचा फोन 55 हजारांत... आयफोन 17 वर बंपर सूट
Recommended image5
DMart Diwali Sale 2026 : डीमार्टमध्ये २००० रुपयांत दिवाळीची खरेदी कशी करायची?
Related Stories
Recommended image1
UPI Budget Usage : UPI वर एक क्लिक आणि खिसा रिकामा... तुम्हालाही आहे का ही सवय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved