- Home
- Utility News
- Saving Scheme : रोज १०० रुपये गुंतवून जमा होईल ५ लाखांचा फंड; कोणती आहे सरकारी योजना?
Saving Scheme : रोज १०० रुपये गुंतवून जमा होईल ५ लाखांचा फंड; कोणती आहे सरकारी योजना?
Investment Scheme : सध्या शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता अनेक गुंतवणुकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल असतो. जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसह चांगले रिटर्न्स देणारी योजना शोधत असला तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.

सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला व्याजदर
सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला व्याजदर मिळावा, अशी योजना शोधत असाल तर एक चांगला पर्याय आहे. ही योजना सरकारी असून यात झिरो रिस्क आहे. या योजनेत १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

५ लाखांचा फंड मिळेल
ही योजना आहे पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉजिट अकाऊंट अर्थात RD योजना. दर महिन्याला ३ हजारांची गुंतवणूक केल्यास या योजनेच्या अखेरीस ५ लाखांचा फंड मिळू शकतो.
पोस्ट ऑफिसची RD योजना
पोस्ट ऑफिसच्या या RD योजनेत वर्षाला ६.७ टक्के फिक्स व्याज मिळतं. तसंच या योजनेतून कधी गरजेच्या वेळी कर्जही घेता येतं.
कसा जमा होईल ५ लाखांचा फंड?
एखाद्या गुंतवणुकदाराने दिवसाला रोज १०० रुपये किंवा दर महिन्याला ३ हजार रुपयांची गुंतवणूक केली, तर ५ लाख जमवता येतील. पण ही ३ हजारांची गुंतवणूक १० वर्ष सुरू ठेवावी लागेल.
१० वर्षांची गुंतवणूक
१० वर्षात एकूण रक्कम ३ लाख ६० हजार इतकी होईल. तर एकूण रकमेवर १ लाख ५२ हजार रुपये व्याज मिळेल. यात RD योजनेत ३ हजार प्रमाणे १० वर्ष गुंतवणूक केल्यास एकूण ५ लाख १२ हजार रुपये मिळतील.
