- Home
- Utility News
- PM Kisan Yojana: तुमचं नाव PM किसान यादीतून Delete झालं? घाबरू नका! ₹2,000 चा हप्ता मिळणारच; या 'मास्टर ट्रिक'ने नाव परत आणा!
PM Kisan Yojana: तुमचं नाव PM किसान यादीतून Delete झालं? घाबरू नका! ₹2,000 चा हप्ता मिळणारच; या 'मास्टर ट्रिक'ने नाव परत आणा!
PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या 21 व्या हप्त्यातून 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. अपूर्ण eKYC, चुकीची माहिती किंवा अपात्रता या कारणांमुळे हे झाले असून, पात्र शेतकरी योग्य प्रक्रिया करून आपले नाव पुन्हा यादीत जोडू शकतात.

तुमचं नाव लाभार्थी यादीतून काढलंय का?
PM Kisan Yojana Update: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये दिले. मात्र, यावेळी एक मोठी गोष्ट दिसून आली अंदाजे 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे PM Kisan लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. तुमचं नावही त्यात असेल तर काळजी करू नका, कारण ते पुन्हा जोडणे शक्य आहे.
31 लाख संशयित लाभार्थी उघड
अलीकडील तपासणीमध्ये 31 लाख लाभार्थी संशयास्पद असल्याचे समोर आले. काही लोक अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने कठोर पावले उचलत अशा सर्वांचा 21 वा हप्ता थांबवला आहे.
किती शेतकऱ्यांची नावे कट झाली?
20 व्या हप्त्यात (2 ऑगस्ट) 9.71 कोटी शेतकऱ्यांना रक्कम जमा झाली होती. 21 व्या हप्त्यात फक्त 9.35 कोटी 53 हजार 157 शेतकऱ्यांना पैसे मिळाले.
म्हणजेच 35 लाख 88 हजार 245 शेतकऱ्यांची नावे वगळली गेली.
राज्यनिहाय मोठा बदल
उत्तर प्रदेश: सुमारे 19 लाख नावं कट
ओडिशा: 34.84 लाख - 34.12 लाख
इतर अनेक राज्यांमध्येही लाभार्थी संख्या कमी
तुमचं नाव का काढलं गेलं असेल?
सरकारनुसार खालील कारणांमुळे नाव वगळले जाऊ शकते.
पती-पत्नी दोघेही योजना वापरत होते
अल्पवयीन मुलाला चुकीने लाभ दिला गेला
eKYC पूर्ण न केलेले
शेतकरी आयडी नसलेले
माहिती अपूर्ण किंवा चुकीची
नाव पुन्हा कसे जोडता येईल? (स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन)
eKYC तात्काळ पूर्ण करा
PM Kisan पोर्टलवर जाऊन Aadhaar आधारित eKYC करा.
शेतकरी आयडी तयार करा
ऑनलाइन घरबसल्या Farmer ID निर्माण करता येते.
डुप्लिकेट नावे हटवा
कुटुंबात दोन सदस्य लाभ घेत असतील तर पोर्टलवरील ‘Surrender’ पर्याय वापरून एक नाव परत करा.
कृषी कार्यालयात पडताळणी
सर्व माहिती योग्य असतानाही नाव कट झालं असेल, तर स्थानिक कृषी विभागाकडे तक्रार नोंदवा.
नाव पुन्हा समाविष्ट करता येईल का?
होय! जर तुम्ही पात्रता अटी पूर्ण करत असाल, तर PM किसान योजनेत तुमचे नाव पुन्हा अॅड केले जाईल. इतकेच नाही, तर थांबलेले/प्रलंबित हप्तेही मिळण्याची शक्यता आहे.

