- Home
- Utility News
- PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो सावधान! PM किसानचा हप्ता हवाय? मग 'हे' काम आजच पूर्ण करा!
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो सावधान! PM किसानचा हप्ता हवाय? मग 'हे' काम आजच पूर्ण करा!
PM Kisan Yojana 22nd Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी, बँक खाते-आधार लिंक आणि DBT सेवा सक्रिय असणे अनिवार्य आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! PM किसानचा हप्ता हवाय?
PM Kisan Yojana 22nd Installment : देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मागील म्हणजेच २१ वा हप्ता नोव्हेंबर २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता पुढील हप्ता मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
पुढील हप्त्यासाठी ‘ई-केवायसी’ अनिवार्य
PM-Kisan चा २२ वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ओटीपीद्वारे ई-केवायसी करू शकतात किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
बँक खाते आणि आधार लिंक असणे आवश्यक
याशिवाय, शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि DBT (Direct Benefit Transfer) सेवा सक्रिय असणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा DBT सक्रिय नसल्यामुळे किंवा आधार-बँक लिंक नसल्यामुळे हप्ता खात्यात जमा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदा बँकेत जाऊन ही माहिती तपासून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
२२ वा हप्ता कधी येणार?
सरकारकडून अद्याप २२ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, अर्जातील चुकीची माहिती जसे की नावातील चूक, आधार क्रमांक, बँक खाते तपशील किंवा जमिनीच्या नोंदीतील त्रुटी यामुळे अनेक शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
ओटीपीद्वारे आधार ई-केवायसी कसे कराल?
सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा
उजव्या बाजूला असलेल्या e-KYC पर्यायावर क्लिक करा
तुमचा आधार क्रमांक टाका
आधार-लिंक्ड मोबाईलवर आलेला OTP एंटर करा
OTP पडताळणी पूर्ण झाल्यावर ई-केवायसी यशस्वी होईल
मोबाइल अॅपवर फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी
गुगल प्ले स्टोअरवरून PM-Kisan App आणि Aadhaar Face RD App डाउनलोड करा
नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करा
Beneficiary Status मध्ये जा
e-KYC स्टेटस ‘No’ असल्यास e-KYC वर क्लिक करा
आधार क्रमांक टाका आणि Face Scan ला परवानगी द्या
फेस स्कॅन यशस्वी झाल्यानंतर ई-केवायसी पूर्ण मानली जाते आणि साधारणतः २४ तासांत स्टेटस अपडेट होते.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
PM-Kisan चा पुढील हप्ता वेळेत मिळावा यासाठी ई-केवायसी, आधार-बँक लिंक आणि DBT स्टेटस तातडीने तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

