MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • शेतकऱ्यांनो लक्ष द्या! PM किसानचा २२ वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार? पण 'ही' अट पूर्ण न केल्यास पैसे अडकणार!

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! PM किसानचा २२ वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार? पण 'ही' अट पूर्ण न केल्यास पैसे अडकणार!

PM Kisan Yojana 22th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ही रक्कम जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान जमा होण्याची शक्यताय. मात्र, सरकारने यावेळी 'फार्मर आयडी' अनिवार्य केला. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Jan 15 2026, 04:13 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
PM Kisan चा 22 वा हप्ता कधी मिळणार?
Image Credit : iSTOCK

PM Kisan चा 22 वा हप्ता कधी मिळणार?

मुंबई : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरलेल्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. शेतीच्या कामांसाठी खते, बियाणे आणि औषधांच्या खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे हे २,००० रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने यावेळी एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाची अट लागू केली आहे. 

25
२२ वा हप्ता कधी येणार? (Expected Date)
Image Credit : iSTOCK

२२ वा हप्ता कधी येणार? (Expected Date)

केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी, योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो. त्यानुसार

संभाव्य वेळ: जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी ते मार्च २०२६ दरम्यान.

बजेट कनेक्शन: साधारणपणे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Related Articles

Related image1
Post Office ची भन्नाट स्कीम! एकदा पैसे गुंतवा आणि दरमहा मिळवा ₹५,५५०; जाणून घ्या सविस्तर
Related image2
Best Family SUV : 600km+ रेंज... 7 सीटर इलेक्ट्रिक SUV येतेय... फॅमिली कार घेणाऱ्यांसाठी 'मोठी अपडेट'!
35
सावधान! 'Farmer ID' शिवाय पैसे मिळणार नाहीत
Image Credit : iSTOCK

सावधान! 'Farmer ID' शिवाय पैसे मिळणार नाहीत

यावेळी केवळ ई-केवायसी (e-KYC) करून चालणार नाही. सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी 'फार्मर आयडी' (Farmer ID) अनिवार्य केला आहे. का गरजेचा आहे फार्मर आयडी? अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती आणि दुहेरी नोंदणी रोखण्यासाठी सरकारने हा युनिक ओळख क्रमांक लागू केला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नसेल, त्यांचा हप्ता केंद्र सरकारकडून रोखला जाऊ शकतो. 

45
हप्ता अडकू नये म्हणून 'या' ४ गोष्टी तपासा
Image Credit : iSTOCK

हप्ता अडकू नये म्हणून 'या' ४ गोष्टी तपासा

१. Farmer ID: तातडीने आपला शेतकरी आयडी तयार करून घ्या.

२. e-KYC: मोबाईलवरून किंवा सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करा.

३. आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि 'डीबीटी' (DBT) पर्याय सुरू असणे आवश्यक आहे.

४. जमीन रेकॉर्ड: तुमच्या जमिनीच्या नोंदी (Land Records) अधिकृत पोर्टलवर अपडेट असल्याची खात्री करा. 

55
तुमचे नाव यादीत कसे तपासायचे?
Image Credit : Asianet News

तुमचे नाव यादीत कसे तपासायचे?

१. संशयास्पद लिंक काढली या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

२. 'Beneficiary List' या पर्यायावर क्लिक करा.

३. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

४. तुमची माहिती भरून यादीत नाव तपासा. 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Best Family SUV : 600km+ रेंज... 7 सीटर इलेक्ट्रिक SUV येतेय... फॅमिली कार घेणाऱ्यांसाठी 'मोठी अपडेट'!
Recommended image2
Mahindra December Sales : महिंद्राने ह्युंदाई-टाटाला टाकले मागे! डिसेंबर विक्रीत जबरदस्त वाढ!, या वाहनाला तुफान पसंती
Recommended image3
Indian Auto Sales December 2025 : डिसेंबरमधील विक्रीचे आकडे पाहून ऑटो जग थक्क!, कोणत्या वाहनांना मिळाली जास्त पसंती?
Recommended image4
मुलं तासन्तास शॉर्ट्स पाहताय...आता ते नियंत्रित करता येणार; काय आहे YouTube चे नवीन पॅरेंटल कंट्रोल?
Recommended image5
Investment Tips: पोस्ट ऑफिसची ही योजना माहीत आहे? 5 वर्षांत 2.5 लाख रुपये व्याज
Related Stories
Recommended image1
Post Office ची भन्नाट स्कीम! एकदा पैसे गुंतवा आणि दरमहा मिळवा ₹५,५५०; जाणून घ्या सविस्तर
Recommended image2
Best Family SUV : 600km+ रेंज... 7 सीटर इलेक्ट्रिक SUV येतेय... फॅमिली कार घेणाऱ्यांसाठी 'मोठी अपडेट'!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved