- Home
- Utility News
- PM किसानचा 21वा हप्ता मिळवायचा आहे? नोंदणी कुठे आणि कशी करायची, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया!
PM किसानचा 21वा हप्ता मिळवायचा आहे? नोंदणी कुठे आणि कशी करायची, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया!
PM Kisan Yojana 21 Installment : PM-Kisan योजनेचा 21 वा हप्त्यासाठी e-KYC आणि नोंदणी आवश्यक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान हप्ता मिळण्याची शक्यता असून, नवीन नियमांचे पालन न केल्यास तो थांबू शकतो.

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑगस्ट 2025 मध्ये जमा झाला आहे. आता सर्वांची नजर 21 व्या हप्त्यावर आहे. मात्र यंदा सरकारने काही नवे नियम लागू केले असून, त्याचे पालन न केल्यास पुढील हप्ता थांबू शकतो. शेतकऱ्यांनी हे नवीन अपडेट्स समजून घेऊन वेळेत आपली नोंदणी आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
योजना म्हणजे काय?
PM-Kisan योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये (दर चार महिन्यांनी ₹2,000) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.
2025 मधील महत्त्वाचे बदल
e-KYC अनिवार्य:
e-KYC पूर्ण केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही.
किसान कार्ड आवश्यक:
नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे वैध किसान कार्ड किंवा ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
अचूक माहिती हवीच:
आधार कार्ड आणि बँक खाती जोडलेली असावीत.
जमीनधारणा संबंधित नोंदी योग्य असाव्यात.
नवीन नोंदणी कशी कराल?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या. pmkisan.gov.in
‘Farmers Corner’ मध्ये ‘New Farmer Registration’ निवडा.
आधार क्रमांक टाका आणि मागितलेली माहिती भरा.
नाव, पत्ता, बँक तपशील, जमीन माहिती इ.
मोबाईलवर आलेल्या OTP ने खात्री करा.
सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड करून अर्ज सबमिट करा.
नोंदणीनंतर संबंधित यंत्रणा तुमची माहिती तपासून लाभार्थी यादीत तुमचे नाव समाविष्ट करेल.
e-KYC कशी करावी?
संकेतस्थळावर ‘e-KYC’ पर्याय निवडा.
आधार क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी करा.
हवे असल्यास जवळच्या CSC केंद्रावर जाऊन सुद्धा e-KYC करता येते.
लाभार्थी यादीत नाव तपासायचे असल्यास
pmkisan.gov.in वर जा.
‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.
तुमच्या खात्यातील स्थिती तपासा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं
आधार कार्ड
बँक पासबुक
7/12 उतारा किंवा जमीन नोंदणी कागदपत्रं
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
21 वा हप्ता केव्हा येणार?
20 वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये मिळाल्यामुळे, 21 वा हप्ता ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. त्याआधी e-KYC आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून माहिती अपडेट न केल्यास पुढचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
21 वा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in वर जाऊन लवकरात लवकर नोंदणी, e-KYC, आणि माहिती पडताळणी पूर्ण करावी. सरकारी नियमानुसार आवश्यक सर्व प्रक्रिया वेळेत केल्यासच पुढील हप्ता खात्यात जमा होईल.

