Numerology : या तारखांना जन्मलेल्या मुली भाग्यवान! मिळतो प्रेमळ आणि समजूतदार पती
Numerology : अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली पतीच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना श्रीकृष्णासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा पती मिळण्याची शक्यता असते. जाणून घ्या कोणत्या आहेत या तारखा -

मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो. सूर्य हा त्यांचा स्वामी ग्रह आहे. त्यांच्यात नेतृत्वगुण अधिक असतात. त्यांचे पती त्यांना आदर देतात आणि प्रत्येक निर्णयात त्यांची साथ देतात.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक २ असतो. चंद्र हा त्यांचा स्वामी ग्रह आहे. या मुली खूप हळव्या मनाच्या असतात. त्यांना समजून घेणारा आणि श्रीकृष्णासारखा प्रेमळ पती मिळतो.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ६ असतो. शुक्र हा त्यांचा स्वामी ग्रह आहे. या मुली स्वभावाने खूप आकर्षक असतात. त्यांचे पती खूप रोमँटिक असतात आणि पत्नीला राणीसारखे ठेवतात.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ७ असतो. केतू हा त्यांचा स्वामी ग्रह आहे. त्यांना जोडीदार अगदी 'सोलमेट'सारखा मिळतो. त्यांचे नाते राधा-कृष्णाच्या प्रेमासारखे पवित्र असते.
(टीप: या लेखात दिलेली माहिती ज्योतिषीय मते, धार्मिक ग्रंथ आणि पंचांग यावर आधारित आहे. Asianet News Marathi याची पुष्टी करत नाही. केवळ माहिती पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. याची अचूकता, विश्वासार्हता आणि परिणामांसाठी Asianet News Marathi कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही)

