night orders : रात्रीच्या वेळी भारतात सर्वात जास्त 'या' गोष्टीला मागणी
night orders : भारतीय तरुण रात्री उशिरा विविध पदार्थ ऑर्डर करतात, ज्यात चिकन बिर्याणी, पिझ्झा आणि चिकन बर्गर सर्वाधिक लोकप्रिय आहेत. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, कंडोम आणि सॅनिटरी पॅड्ससारख्या आपत्कालीन वस्तूंची मागणीही रात्रीच्या वेळी वाढते.

1. पिझ्झा :
सध्या भारतीय तरुणाई ही रात्री उशिरा पिझ्झा ऑर्डर करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विशेष म्हणजे विकेंडच्या रात्री पिझ्झाच्या ऑर्डरमध्ये 3 पटीने वाढ होत असते.
2. नूडल्स आणि चायनीज फूड :
सध्या चायनीज खाण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी झटपट आणि चवदार पर्याय म्हणून लोक नूडल्स आणि फ्राइड राईस मोठ्या प्रमाणावर ऑर्डर करतात. इतकेच नव्हे तर यासोबतच जेवणानंतर रात्री गोड खाणे पसंत करत असल्याने बहुतांश जण हे रात्री आईस्क्रीम ऑर्डर करतात.
3. आपत्कानील वस्तु (इमर्जन्सी आयटम्स) :
खाण्याच्या वस्तुंसोबतच रात्रीच्या वेळी लोक कंडोम आणि सॅनिटरी पॅड्स यांसारख्या वैयक्तिक वस्तूही ऑर्डर करतात. विशेष म्हणजे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी या वस्तुंना मागणी वाढताना दिसून येत आहे.
4. चिकन बर्गर :
माध्यमांनी दिलेल्या अनेक रिपोर्ट्सनुसार, मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत चिकन बर्गर हा सर्वात जास्त ऑर्डर केला जाणारा पदार्थ ठरला आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये मध्यरात्रीच्या वेळी 18 लाखांहून अधिक बर्गरची ऑर्डर देण्यात आली होती.
5. चिकन बिर्याणी :
खाद्यपदार्थांच्या बाबतीत रात्रीच्या वेळी बिर्याणी ही भारतीयांची सर्वात मोठी पसंती ठरली आहे. Swiggy ने दिलेल्या माहितीनुसार, चिकन बिर्याणी ही 24 तास ऑर्डर केली जाणारी 'सुपरस्टार' डिश आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हजारो लोक बिर्याणीलाच प्राधान्य देतात, असे दिसून आले आहे.