MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • WhatsApp Scam Alert : 'याला ओळखता का?' व्हॉट्सॲपवर येणारा ब्लर फोटो करेल तुमचं बँक खातं रिकामं

WhatsApp Scam Alert : 'याला ओळखता का?' व्हॉट्सॲपवर येणारा ब्लर फोटो करेल तुमचं बँक खातं रिकामं

व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून येणारे ब्लर फोटो डाऊनलोड केल्यास तुमचं बँक खातं क्षणात रिकामं होऊ शकतं. सायबर सुरक्षा विभागाने या नव्या आणि अत्यंत धोकादायक सायबर फसवणुकीबाबत गंभीर इशारा दिला आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 23 2026, 03:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
बँक खातं रिकामं करणारा नवा मालवेअर स्कॅम
Image Credit : Chatgpt

बँक खातं रिकामं करणारा नवा मालवेअर स्कॅम

सायबर भामटे आता व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून ब्लर (अस्पष्ट) फोटो पाठवत आहेत. युजर्सनी हा फोटो डाऊनलोड करताच मोबाईलमध्ये एक मालवेअर इन्स्टॉल होतो. हा मालवेअर तुमच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम चोरून नेतो. सायबर सुरक्षा विभागाने या नव्या स्कॅमबाबत गंभीर इशारा दिला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
व्हॉट्सॲपवर येणाऱ्या ब्लर फोटोंवर क्लिक करू नका
Image Credit : chatgpt

व्हॉट्सॲपवर येणाऱ्या ब्लर फोटोंवर क्लिक करू नका

गेल्या काही महिन्यांपासून सायबर भामटे सामान्य नागरिकांना टार्गेट करत आहेत. आता त्यांनी व्हॉट्सॲप युजर्सना जाळ्यात ओढण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. 'कसे आहात? मजेत ना?' किंवा 'याला ओळखता का?' असा मेसेज आणि सोबत एक ब्लर फोटो पाठवला जातो.

लोक उत्सुकतेपोटी हा फोटो उघडून पाहतात. पण या एका क्लिकमुळे बँक खात्यातील सर्व पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेला कोणताही फोटो उघडून पाहण्याची चूक करू नका.

Related Articles

Related image1
TRAI New Rules : मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल; जिओ, एअरटेल आणि Vi युजर्ससाठी गुड न्यूज
Related image2
Amazon Sale : 5,000 ते 50,000 वाचवा; 8 ऑक्टोबरआधी या 10 वस्तू घेऊ नका
34
ही फसवणूक नेमकी कशी होते?
Image Credit : Chatgpt

ही फसवणूक नेमकी कशी होते?

अनोळखी नंबरवरून तुम्हाला शुभेच्छा, मीम्स किंवा जाहिरातीच्या बहाण्याने एक ब्लर फोटो येतो. तुम्ही तो फोटो डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करता, तेव्हा नकळत तुमच्या फोनमध्ये एक धोकादायक ॲप किंवा मालवेअर डाऊनलोड होतो.

हा मालवेअर तुमच्या फोनमधील बँकिंग ॲप्सचे पासवर्ड्स आणि इतर महत्त्वाची माहिती चोरतो. या माहितीच्या आधारे भामटे तुमच्या खात्यातील पैसे परस्पर ट्रान्सफर करतात. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेली कोणतीही फाईल किंवा लिंक उघडू नका.

44
फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
Image Credit : Chatgpt

फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

सर्वात आधी तुमच्या व्हॉट्सॲपच्या 'Settings' मध्ये जा. तिथे 'Storage and Data' हा पर्याय निवडा. यातील 'Media auto-download' पूर्णपणे बंद (Off) करा. मोबाईल डेटा, वाय-फाय आणि रोमिंग या तिन्ही पर्यायांसाठी फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होणे बंद ठेवा.

घरातील ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसलेल्या व्यक्तींना या धोक्याची नक्की कल्पना द्या. त्यांना अनोळखी मेसेज उघडण्यापासून रोखा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
RBI Rules : बँक खात्यातून परस्पर पैसे कट झालेत? टेन्शन घेऊ नका, असे मिळवा परत
Recommended image2
Railway Shop Licence : रेल्वे स्टेशनवर स्वतःचं दुकान कसं थाटायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!
Recommended image3
Escalator vs Travelator : एस्केलेटर आणि ट्रॅव्हलेटरमध्ये नेमका फरक काय?
Recommended image4
ATM PIN History : एटीएमचा पिन ४ अंकीच का असतो? यामागची रंजक गोष्ट वाचा!
Recommended image5
iPhone 18 Launch : यावर्षी आयफोन 18 येणार नाही; जाणून घ्या लॉन्च डेट आणि किंमत
Related Stories
Recommended image1
TRAI New Rules : मोबाईल रिचार्जमध्ये मोठा बदल; जिओ, एअरटेल आणि Vi युजर्ससाठी गुड न्यूज
Recommended image2
Amazon Sale : 5,000 ते 50,000 वाचवा; 8 ऑक्टोबरआधी या 10 वस्तू घेऊ नका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved