New Hyundai Venue 2025 Full Price List : नवीन स्टायलिश ह्युंदाई वेन्यू भारतात विक्रीसाठी दाखल झाली आहे. या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीची संपूर्ण किंमत आता उपलब्ध आहे. जाणून घ्या व्हेरायंटनुसार किंमत..

New Hyundai Venue 2025 Full Price List : नवी ह्युंदाई वेन्यू आता भारतात विक्रीसाठी दाखल झाली आहे. सुरुवातीला, HX2, HX4, HX5 पेट्रोल (NA) मॅन्युअल व्हेरिएंटसाठी अनुक्रमे 7.90 लाख, 8.80 लाख आणि 9.15 लाख रुपये किंमत जाहीर करण्यात आली होती. आता, या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीची संपूर्ण किंमत यादी समोर आली आहे.

HX6 आणि HX 6T पेट्रोल (NA) मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 10.43 लाख रुपये आणि 10.70 लाख रुपये आहे. टर्बो-पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 8.80 लाख ते 11.81 लाख रुपयांपर्यंत आहे, तर टर्बो-पेट्रोल DCT ट्रिम्सची किंमत 10.67 लाख ते 14.56 लाख रुपयांपर्यंत आहे. डिझेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 9.70 लाख ते 12.51 लाख आणि 11.58 लाख ते 15.51 लाख रुपये आहे.

नवीन ह्युंदाई वेन्यू एन लाइनची किंमत

2025 ह्युंदाई वेन्यू एन लाइन मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 10.55 लाख रुपये आहे, तर एन6 आणि एन10 डीसीटी व्हेरिएंटची किंमत 11.45 लाख रुपये आणि 15.30 लाख रुपये आहे.

18,000 रुपये अतिरिक्त देऊन ग्राहक HX6, HX6T, HX7, HX8, HX10, N Line N6 DCT आणि N Line N10 DCT मध्ये ड्युअल-टोन कलर पर्याय निवडू शकतात. यामध्ये ॲबिस ब्लॅक रूफसह हेझेल ब्लू आणि ॲटलस व्हाइट या ड्युअल-टोन शेड्सचा समावेश आहे. मोनोटोन कलर पॅलेटमध्ये ॲबिस ब्लॅक, ड्रॅगन रेड, हेझेल ब्लू, ॲटलस व्हाइट, मिस्टिक सॅफायर आणि टायटन ग्रे यांचा समावेश आहे.

नवीन 2025 ह्युंदाई वेन्यूची किंमत

व्हेरिएंटनुसार एक्स-शोरूम किंमत

पेट्रोल-एमटी –

एचएक्स2 7.90 लाख रुपये

एचएक्स4 8.80 लाख रुपये

एचएक्स5 9.15 लाख रुपये

एचएक्स6 10.43 लाख रुपये

एचएक्स 6टी 10.70 लाख रुपये

टर्बो-पेट्रोल एमटी –

एचएक्स2 8.80 लाख रुपये

एचएक्स5 9.74 लाख रुपये

एचएक्स8 11.81 लाख रुपये

N6 (N लाइन) MT 10.55 लाख रुपये

टर्बो-पेट्रोल डीसीटी –

एचएक्स5 10.67 लाख रुपये

एचएक्स6 11.98 लाख रुपये

एचएक्स8 12.85 लाख रुपये

एचएक्स10 14.56 लाख रुपये

N6 (N लाइन) 11.45 लाख रुपये

N10 (N लाइन) 15.30 लाख रुपये

डिझेल-एमटी –

एचएक्स2 9.70 लाख रुपये

एचएक्स5 10.64 लाख रुपये

एचएक्स7 12.51 लाख रुपये

डिझेल-एटी –

एचएक्स5 11.58 लाख रुपये

एचएक्स 10 - 15.51 लाख रुपये