Gold Rate Today : आज 3 जुलैला सोने पुन्हा 1 लाखांवर, चांदीही झाली लखपती, वाचा दर
मुंबई : भारतीय सर्राफा बाजारात आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ३ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या दरात तब्बल ३०६ रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात १०६० रुपयांची भर नोंदवली गेली.
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
लग्नसराईमुळे सोन्याचांदिचे दर वाढताना दिसून येत आहेत
लग्नसराईमुळे सोन्याचांदिचे दर वाढताना दिसून येत आहेत
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ९७,७८६ रुपये
आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ९७,७८६ रुपये इतका होता. त्यावर ३% जीएसटी जोडल्यास हा दर १,००,७१९ रुपये इतका होतो. चांदीचा दरही १ किलोसाठी १,१०,९८० रुपये इतक्या उच्चांकावर पोहोचला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या आणि दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार
२३ कॅरेट सोनं : ₹९७,३९४ प्रति तोळा
२२ कॅरेट सोनं : ₹८९,५७२ प्रति तोळा (जीएसटीसह ₹९२,२५९)
१८ कॅरेट सोनं : ₹७३,३४० प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह ₹७५,५४०)
१४ कॅरेट सोनं : ₹५७,२०५ प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह ₹५८,९२१)
₹१,००० ते ₹२,००० पर्यंत फरक दिसू शकतो
हे दर मेकिंग चार्जेसशिवायचे असून स्थानिक बाजारात त्यात ₹१,००० ते ₹२,००० पर्यंत फरक दिसू शकतो.
IBJA दररोज दोन वेळा – दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता – दर जाहीर करते.
३१ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ₹७६,०४५
सालाच्या सुरुवातीपासून सोन्याने ₹२२,००० पेक्षा अधिक दरवाढ नोंदवली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ₹७६,०४५ प्रति १० ग्रॅम इतका होता, जो आज ₹९७,७८६ वर पोहोचला आहे – म्हणजेच ₹२२,०४६ ची वाढ. चांदीचा दरही ₹८५,६८० वरून वाढून आज ₹१,१०,९८० वर पोहोचला आहे, म्हणजेच ₹२१,७३१ ची वाढ.
हे दर पुढे आणखी वाढतील का...
या सततच्या दरवाढीमुळे सोनं आणि चांदी हे गुंतवणुकीसाठी पुन्हा एकदा आकर्षक पर्याय बनत चालले आहेत. तथापि, वाढत्या दरांमुळे सामान्य ग्राहकांच्या खरेदीच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे दर पुढे आणखी वाढतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.