- Home
- Utility News
- MHT CET 2026 : विद्यार्थ्यांनो, वेळ दवडू नका! सीईटीच्या नोंदणीला सुरुवात; 'या' तारखेपर्यंतच आहे संधी!
MHT CET 2026 : विद्यार्थ्यांनो, वेळ दवडू नका! सीईटीच्या नोंदणीला सुरुवात; 'या' तारखेपर्यंतच आहे संधी!
MHT CET 2026 Update : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एमपीएड आणि एमएड पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेची ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झाली असून, अंतिम तारीख 20 जानेवारी आहे. यावर्षीपासून सीईटी परीक्षेच्या नोंदणीसाठी अपार आयडी अनिवार्य करण्यात आलाय.

सीईटी परीक्षांच्या नोंदणीला सुरुवात! शेवटची तारीख काय?
MHT CET 2026 Update : 2026–27 या शैक्षणिक वर्षासाठी सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एमपीएड (शारीरिक शिक्षणशास्त्र) आणि एमएड (शिक्षणशास्त्र) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत वेबसाईट
सीईटी परीक्षेसाठीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज, नोंदणी वेळापत्रक तसेच माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी नियमितपणे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. एमपीएड आणि एमएड या दोन्ही अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉम्प्युटर आधारित (ऑनलाईन) पद्धतीने घेतली जाणार आहे.
परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा
एमपीएड सीईटी
अर्ज नोंदणी: 20 जानेवारीपर्यंत
सीईटी परीक्षा: 24 मार्च
एमपीएड फिल्ड टेस्ट (ऑफलाईन): 25 मार्च
एमएड सीईटी
अर्ज नोंदणी: 20 जानेवारीपर्यंत
सीईटी परीक्षा: 25 मार्च
दरम्यान, कला, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण विभागांतील एकूण 17 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे.
‘अपार’ आयडी आणि यूडीआयडी अनिवार्य
विद्यार्थ्यांची अचूक माहिती मिळावी आणि पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी सीईटी कक्षाने प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (APAR) आयडी बंधनकारक केला आहे. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी युनिक डिसॲबिलिटी आयडी (UDID) आवश्यक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप APAR आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजिलॉकर ॲपच्या माध्यमातून तात्काळ तयार करून घ्यावा, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
नोंदणी, परीक्षेचे अद्ययावत वेळापत्रक आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे.

