मर्सिडीज-बेंझने आपली नवीन CLA इलेक्ट्रिक सेडान भारतात सादर केली आहे. १० मार्चपासून तिचं बुकिंग सुरू होईल. ही कार MMA प्लॅटफॉर्मवर बनवली असून, 85kWh बॅटरीसह एका चार्जमध्ये तब्बल 792 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे.

र्सिडीज-बेंझने अखेर आपली नवीन CLA इलेक्ट्रिक सेडान भारतात सादर केली आहे. या इलेक्ट्रिक कारसाठी १० मार्चपासून प्री-बुकिंग सुरू होणार असून, एप्रिलमध्ये ती अधिकृतरित्या लॉन्च होईल. कंपनीने अजून किंमत जाहीर केलेली नाही, पण एक्स-शोरूम किंमत ५५ लाख ते ६० लाखांच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. ग्राहकांना ही कार पोलार व्हाईट, कॉस्मिक ब्लॅक, अल्पाइन ग्रे, क्लिअर ब्लू आणि पॅटागोनिया रेड अशा पाच रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

ही कार मर्सिडीज बेंझच्या मॉड्युलर आर्किटेक्चर (MMA) प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. यात 800-व्होल्टची इलेक्ट्रिक सिस्टीम आहे. कारमध्ये 85kWh क्षमतेची बॅटरी असून, ती मागच्या चाकांना पॉवर देणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. ही मोटर 268bhp पॉवर निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका पूर्ण चार्जमध्ये तब्बल 792 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यात 2-स्पीड ट्रान्समिशन असून, फक्त 6.7 सेकंदात 0 ते 100 किमी/तास वेग पकडते. ही कार 240kW पर्यंत DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे फक्त 20 मिनिटांत 400 किलोमीटरची रेंज मिळू शकते.

फीचर्स

भारतात ही कार 250+ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. यात मर्सिडीजची नवीन MB.OS सिस्टीम असलेली मोठी 14-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. सोबतच 10.25-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्लेही मिळेल. इतर फीचर्समध्ये सहा 100W यूएसबी-सी फास्ट चार्जिंग पोर्ट, वायरलेस चार्जिंग, OTA (ओव्हर-द-एअर) सॉफ्टवेअर अपडेट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कॅमेरा-रडारवर आधारित लेव्हल 2 ADAS यांचा समावेश आहे.

माप आणि डिझाइन

मापांबद्दल बोलायचं झाल्यास, CLA इलेक्ट्रिकची लांबी 4,723 मिमी, रुंदी 1,855 मिमी आणि उंची 1,468 मिमी आहे. तिचा व्हीलबेस 2,790 मिमी आहे. यात 405 लिटरची बूट स्पेस आणि 101 लिटरची फ्रंक (पुढील स्टोरेज) मिळते. डिझाइनच्या बाबतीत, गाडीला 142 लहान चमकणाऱ्या ताऱ्यांसह एक बंद फ्रंट ग्रिल, ताऱ्यांच्या आकाराचे LED DRL असलेले ट्विन-पॉड हेडलॅम्प, 18-इंचाचे अलॉय व्हील, फ्लश डोअर हँडल आणि कनेक्टेड LED टेललॅम्प्स दिले आहेत, जे तिला एक आकर्षक लुक देतात.