Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 : महाराष्ट्र नगर परिषद 2025 मध्ये 3138 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करणार आहे. गट क आणि गट ड मध्ये विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 : आपण शासकीय नोकरीच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे! महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 अंतर्गत तब्बल 3138 रिक्त पदांची मोठी भरती जाहीर होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

भरतीविषयी माहिती

संस्था महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय (DMA Maharashtra)

पदांचा प्रकार गट क व गट ड

एकूण जागा 3138 पदे

अर्ज प्रकार ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख अद्याप जाहीर होणे बाकी

अधिकृत संकेतस्थळ mahadma.maharashtra.gov.in

पदांची यादी आणि तपशील

गट क (Group C) – 2151 पदे

स्थापत्य अभियंता (Civil Engineer)

विद्युत अभियंता (Electrical Engineer)

संगणक अभियंता (Computer Engineer)

स्वच्छता व ड्रेनेज अभियंता

लेखापाल / लेखा परीक्षक

कर मूल्यांकन व प्रशासकीय अधिकारी

अग्निशमन अधिकारी

स्वच्छता निरीक्षक

इतर विविध पदे

गट ड (Group D) – 987 पदे

स्वच्छता कामगार

सफाई कर्मचारी

अग्निशमन सहाय्यक

शिपाई

चौकीदार

मदतनीस

इतर सहाय्यक पदे

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

प्रत्येक पदानुसार पात्रता वेगळी आहे. मात्र सर्वसाधारणतः खालील पात्रता आवश्यक:

संबंधित विषयातील पदवी (Engineering, Commerce, General Graduation)

MS-CIT किंवा तत्सम संगणक कोर्स

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा (Age Limit)

खुला प्रवर्ग: 21 ते 38 वर्षे

मागासवर्गीय (SC/ST/OBC): 21 ते 43 वर्षे

(सरकारच्या नियमानुसार सूट लागू)

निवड प्रक्रिया (Selection Process)

उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे (CBT) केली जाणार आहे.

पेपर 1: 60 प्रश्न – 120 गुण

पेपर 2: 40 प्रश्न – 80 गुण

एकूण: 100 प्रश्न – 200 गुण

अर्ज शुल्क (Application Fees)

प्रवर्ग शुल्क

खुला प्रवर्ग ₹1000/-

मागास प्रवर्ग ₹900/-

माजी सैनिक शुल्क माफ

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: जुलै 2025 (अपेक्षित)

अर्ज करण्याची अंतिम तारीख: लवकरच जाहीर

शुल्क भरण्याची अंतिम तारीख: अपडेट नंतर मिळेल

उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. आपली पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.