Vada Pav Recipe : पावसात घरी कसा तयार करावा कुरकुरीत, चटपटीत वडापाव?
मुंबई - घरीच सहज बनवता येईल असा चटपटीत वडापाव! बटाट्याचा वडा बनवण्याची सोपी रेसिपी, लागणारे साहित्य, ते कसे तळायचे आणि वडापावला अधिक चवदार बनवण्यासाठी काही खास टिप्स.

घरच्या घरी चटपटीत वडापाव कसा बनवावा?
वडापाव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे, जो अगदी घरीही छान बनवता येतो. वडापाव सोबत चटणी खाल्ल्यावर मजा येते.
साहित्य
बटाटे – ४ मध्यम आकाराचे (उकडलेले आणि चिरडलेले), हिरव्या मिरच्या – २, आले-लसूण पेस्ट – १ चमचा, हळद – १/४ चमचा, मोहरी – १/२ चमचा, कडीपत्ता – ६-८ पाने, हिंग – एक चिमूट, मीठ – चवीनुसार, कोथिंबीर – २ चमचे (बारीक चिरलेली), तेल – फोडणीसाठी, बेसन – १ कप, हळद – १/४ चमचा, लाल तिखट – १/२ चमचा,मीठ – चवीनुसार, सोडा – एक चिमूट, पाणी – गरजेनुसार, तेल – तळण्यासाठी, पाव – ६, लसूण चटणी / सुकी चटणी, हिरवी चटणी, तांबडी चटणी, तळलेली हिरवी मिरची
बटाटावडा तयार करण्यासाठी
कढईत थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, कडीपत्ता टाका. त्यात आले-लसूण पेस्ट, मिरच्या टाका आणि १ मिनिट परता. आता त्यात हळद आणि उकडलेले बटाटे घालून नीट मिक्स करा. कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा.
पीठ तयार करा
बेसन, हळद, लाल तिखट, मीठ, सोडा एकत्र करून त्यात थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या न होता पीठ तयार करा. हे पीठ न खूप पातळ न खूप घट्ट असावं.
वडे तळा
कढईत तेल गरम करा. तयार बटाट्याचे गोळे बेसनाच्या पिठात बुडवा आणि मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या.
वडापाव तयार करा
पाव मधोमध कापा, पण पूर्ण न तोडता. त्यात लसूण चटणी, हिरवी चटणी लावा. त्यात गरमागरम वडा ठेवा. सोबत तळलेली मिरची सर्व्ह करा.
टीप
पाव थोडासा तूप/लोणी लावून खरपूस भाजल्यास चव अधिक वाढते. तांबडी चटणी झणझणीत असल्यास वडापाव अजून चविष्ट लागतो.
सर्वांना आवडे वडापाव
मुंबईत अगदी सेलिब्रिटीपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच वडापाव खातात. वडापाव केल्यावर त्याला शेंगदाणा चटणी लावून खाल्ल्यास त्यांची चव आणखी वाढते. तसेच पावभाजीप्रमाणे पाव भाजून खाल्ल्यास आणखी वेगळी चव अनुभवता येते.

