- Home
- Utility News
- कार शिकण्यासाठी सरकार देतंय ५००० रुपये! लायसन्स काढलंय? मग उशीर करू नका, 'या' लिंकवर जाऊन लगेच मिळवा ५ हजार
कार शिकण्यासाठी सरकार देतंय ५००० रुपये! लायसन्स काढलंय? मग उशीर करू नका, 'या' लिंकवर जाऊन लगेच मिळवा ५ हजार
Driver Training Financial Help Shcheme : महाराष्ट्र राज्य सरकारने कामगार कल्याण मंडळाद्वारे एक योजना सुरू केली, ज्याअंतर्गत चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी ५ हजारचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

'या' कामगारांसाठी सुरू झाली विशेष योजना, असा करा अर्ज
मुंबई : जर तुम्ही चारचाकी वाहन (Car) शिकण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली असून, त्यांतर्गत ड्रायव्हिंग शिकण्यासाठी चक्क ५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. 'महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा'मार्फत ही योजना राबवली जात असून, त्याचा लाभ कसा घ्यावा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
काय आहे ही योजना?
वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजनेंतर्गत, कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चारचाकी चालवण्याचे (LMV) प्रशिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. शासनमान्य ट्रेनिंग सेंटरमधून प्रशिक्षण पूर्ण करून कायमस्वरूपी परवाना (Permanent License) मिळवल्यानंतर ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेच्या मुख्य अटी आणि पात्रता
कोणाला मिळणार लाभ?: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील जास्तीत जास्त २ सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
उत्पन्नाची अट: ज्या कामगारांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे, तेच या योजनेसाठी पात्र आहेत.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे (मोटार वाहन विभागाच्या नियमानुसार).
कालावधी: प्रशिक्षण पूर्ण करून पक्का परवाना मिळाल्यापासून १ वर्षाच्या आत या योजनेसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे (Documents List)
१. ओळखीचा पुरावा: आधार कार्ड / पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड.
२. वयाचा पुरावा: शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र.
३. परवाना व पावती: शासनमान्य केंद्राची फी भरलेली पावती आणि कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत.
४. नातेसंबंधाचा पुरावा: रेशन कार्ड (जर कुटुंबातील सदस्य अर्ज करत असेल तर).
५. इतर: कामगार असल्याचा पुरावा (LIN धारक), बँक पासबुक प्रत (NEFT साठी).
अर्ज कसा करायचा?
पात्र अर्जदारांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.public.mlwb.in ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करताना आपल्या निवासस्थानाजवळचे किंवा कामाच्या ठिकाणाजवळचे 'कामगार कल्याण केंद्र' निवडणे आवश्यक आहे.

