गॅस सिलेंडरच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीवर काहीसा ब्रेक लावण्यात आला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १ जुलैपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. 

मुंबई : आज १ जुलै रोजी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यामुळे गॅसच्या वाढत्या दरांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. १ जुलैपासून लागू केलेल्या या निर्णयानुसार सिलेंडरच्या किमतीत १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १८३.५० रुपये भाव कमी झाल्याने व्यावसायिक एलपीजीची किंमत २९३० रुपये इतकी झाली आहे. त्याशिवाय तेल कंपन्यांनी ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी अर्थात FTL सिलेंडरची किंमतही कमी केली आहे. हा दर १३ रुपयांनी कमी झाला आहे. या कपातीसह फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरचा दर ८०८.५० रुपये इतका झाला आहे.

दरम्यान, याआधी मागील जून महिन्यत घरगुती गॅसच्या दरात एका सिलेंडरसाठी २९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीमुळे घरगुती १४.२ किलो गॅस सिलेंडरचा दर ९४२ रुपये इतका झाला. या वाढीआधी एलपीजी गॅसचा दर ९१३ रुपये इतका होता. त्यानंतर २९ रुपयांची वाढ झाली.

गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ का?

जागतिक बाजारपेठेत पश्चिम आशियातील संघर्षामुळे याचा परिणाम अनेक गोष्टींवर होतो आहे. त्यापैकी एक म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडर. जागतिक बाजारातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे तेल कंपन्यांनी दरवाढीचे निर्णय घेतले. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर ६० रुपयांची वाढ केली होती.