सार

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. भारतात मतदान करण्यासाठी भारताचे नागरिक असण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण असणे अत्यावश्यक आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (07 मे) पार पडत आहे. देशातील 12 राज्यांसह केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण 94 जागांवर मतदान केले जात आहे. मतदार मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच तुम्ही मतदान करण्यासाठी जात असल्यास ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे.

मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे अत्यावश्यक असते. याशिवाय भारताचे नागरिकत्व आणि वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली असावीत. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदार यादीत आपले नाव नोंदवता येते. निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय ऑफलाइन पद्धतीनेही घराजवळच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट देऊ शकता.

मतदार यादीत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी अशी करा
नव्या मतदारांला आपले नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट https://voters.eci.gov.in/ येथे भेट द्यावी. येथे फॉर्म 6 भरण्याचा पर्याय मिळेल. फॉर्म भरून काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करत मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकता.

तुमचे नाव मतदार यादीत असल्यास तुम्ही मतदान करू शकता. यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ https://voters.eci.gov.in/ येथे भेट द्यावी. यानंतर मतदार यादीत आपले नाव शोधू शकता. याशिवाय तुमचे मतदार केंद्र कोणते आहे हे देखील कळेल.

ओखळपत्राची आवश्यकता
मतदान केंद्रावर मदतान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे ओखळपत्र तपासून पाहण्यासह मतदार यादीत नाव आहे की नाही हे देखील पाहिले जाते. यामुळे तुम्हाला मतदान करण्याआधी खालीलपैकी कोणतेही एक ओखळपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • Unique Disability ID
  • सेवा ओखळ पत्र
  • बँक किंवा पोस्टाद्वारे जारी करण्यात आलेले फोटो असणारे पासबुक
  • हेल्थ वीमा स्मार्ट कार्ड
  • वाहन परवाना
  • पासपोर्ट
  • एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे जारी करण्यात आलेले स्मार्ट कार्ड
  • पेन्शन कागदपत्र
  • मनरेगा जॉब कार्ड

आणखी वाचा : 

Voting स्लिप घरी न आल्यास घरबसल्या करता येईल डाउनलोड, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

लग्नानंतर आधार कार्डवरील पत्नीचे आडनाव बदलायचेय? जाणून घ्या प्रक्रिया