Kitchen Tips: उन्हाळ्यात दही फ्रिजमध्ये ठेवावं का? ठेवलं तर किती दिवसात संपवावं?
Kitchen Tips: उन्हाळ्यात दही शरीराला थंडावा देतं, त्यामुळे त्याचा वापर वाढतो. पण दही लवकर खराब होतं म्हणून अनेकजण ते गरजेपेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवतात. पण खरंच दही फ्रिजमध्ये ठेवावं का? आणि ठेवलं तर किती दिवसात वापरावं? जाणून घेऊया.
15

Image Credit : Getty
उन्हाळ्यात दही साठवण्याची योग्य पद्धत
उन्हाळ्यात दही शरीराला थंडावा देतं, त्यामुळे त्याचा वापर वाढतो. काही जण दही रूम टेंपरेचरला ठेवतात, तर काही जण गरजेपेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवतात. पण जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवलेलं दही खाल्ल्यास काय होतं? फ्रिजमधलं दही किती दिवसांत वापरावं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
25
Image Credit : Getty
दही बाहेर ठेवल्यास काय होतं?
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जे पचनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण हे बॅक्टेरिया योग्य तापमानातच सुरक्षित राहतात. उन्हाळ्यात तापमान 30°C पेक्षा जास्त असल्यास दही बाहेर ठेवू नये. जास्त तापमानात बॅक्टेरियांची वाढ अनियंत्रित होते आणि दही लवकर खराब होतं. असं दही खाल्ल्यास गॅस, फूड पॉइझनिंग किंवा डायरिया होऊ शकतो.
35
Image Credit : Mydiagnostics
दही फ्रिजमध्ये ठेवणं योग्य आहे का?
दही तयार झाल्यावर ते घट्ट होण्यासाठी 4-6 तास रूम टेंपरेचरला ठेवणं चांगलं असतं. पण त्यानंतर ते लगेच फ्रिजमध्ये ठेवणं उत्तम. फ्रिजमध्ये 4°C ते 8°C तापमानात दही जास्त काळ ताजं राहतं. यामुळे हानिकारक बॅक्टेरियाची वाढ थांबते आणि दह्यातील पोषक तत्वं टिकून राहतात.
45
Image Credit : Gemini AI
फ्रिजमधलं दही किती दिवसांत खावं?
तज्ज्ञांच्या मते, फ्रिजमध्ये ठेवलेलं दही 2-3 दिवसांत वापरणं सर्वात चांगलं. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवल्यास त्याची चव तर बदलतेच, पण पोषक तत्वंही कमी होतात. तसेच, दह्याला नेहमी स्वच्छ चमचा लावावा. ओले हात किंवा ओले भांडे वापरल्यास दही लवकर खराब होतं.
55
Image Credit : gemini ai
ही चूक अजिबात करू नका
दही थेट सूर्यप्रकाश पडणाऱ्या ठिकाणी किंवा किचनमधील गरम जागी ठेवू नका. असं केल्यानं दही खूप लवकर आंबट होतं. उन्हाळ्यात सकाळी किंवा दुपारी दही खाणं चांगलं. तसं तर प्रमाणात खाल्ल्यास कोणत्याही वेळी दही खाण्यात काही अडचण नाही.

