iQOO आपला नवीन स्मार्टफोन iQOO Z11 चीनमध्ये २६ मार्च रोजी लाँच करणार आहे. या फोनमध्ये तब्बल 9,020mAh ची दमदार बॅटरी आणि 165Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळणार आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 चिपसेट हे याचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे. यासोबतच iQOO Z11x मॉडेलची माहितीही देण्यात आली आहे.

iQOO आपल्या Z-सीरीजमधला नवीन स्मार्टफोन iQOO Z11 येत्या २६ मार्चला चीनमध्ये अधिकृतरित्या लाँच करणार आहे. यासोबत iQOO Z11x हे मॉडेलही लाँच केलं जाईल. हे मॉडेल भारतात आधीच उपलब्ध आहे. iQOO Z11 चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात 165Hz हाय रिफ्रेश-रेट डिस्प्ले आणि 9,020mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. iQOO ने आतापर्यंत लाँच केलेल्या कोणत्याही स्मार्टफोनपेक्षा ही बॅटरी सर्वात मोठी आहे.

iQOO Z11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iQOO ने Weibo वर दिलेल्या माहितीनुसार, Z11 स्मार्टफोन काळ्या, निळ्या आणि पांढऱ्या अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होईल. काही दिवसांपूर्वी हा फोन गीकबेंचवर V2551A या मॉडेल नंबरसह दिसला होता. यानुसार, iQOO Z11 मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 चिपसेट आणि 16GB पर्यंत रॅम मिळू शकते. बेंचमार्क टेस्टमध्ये या फोनने सिंगल-कोअरमध्ये 1,717 आणि मल्टी-कोअरमध्ये 6,795 पॉइंट्स मिळवले आहेत.

iQOO Z11 मध्ये 6.83-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, 512GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. चीनमधील या फोनची किंमत CNY 2,000 ते CNY 3,000 (म्हणजे अंदाजे 27,122 रुपये ते 40,680 रुपये) दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

iQOO Z11x

भारतात आधीच लाँच झालेल्या iQOO Z11x मॉडेलमध्ये 6.76-इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो एसओसी प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिन ओएस 6 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. 7,200mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट ही याची खासियत आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स आहे. तर सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

या फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP68 आणि IP69+ रेटिंग मिळाली आहे. चीनमध्ये या फोनच्या काळ्या आणि हिरव्या रंगांव्यतिरिक्त आता नवीन पांढरा रंगही सादर करण्यात आला आहे. iQOO Z11 भारतात कधी लाँच होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.