सार
सिम स्लॉट नसलेला हा अतिशय पातळ आयफोन भारतीय ग्राहकांना पसंत पडेल का, याबाबत शंका आहे.
दिल्ली: अपल कंपनी २०२५ मध्ये त्यांचा सर्वात पातळ आयफोन लाँच करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. आयफोन १७ एअर/स्लिम अशी नावे या फोन मॉडेलसाठी चर्चेत आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा फोन भारतीय वापरकर्त्यांना फारसा आवडणार नाही, असे हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
आईफोन १७ एअर/स्लिम फोनची जाडी पाच ते सहा मिलिमीटर दरम्यान असण्याची शक्यता आहे. फोनची जाडी इतकी कमी झाल्यामुळे फिजिकल सिम ट्रे या डिव्हाइसमधून काढून टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय वापरकर्त्यांना सर्वाधिक निराशा होईल. आयफोनमधून सिम ट्रे काढून टाकल्याने अमेरिकन वापरकर्त्यांना कोणताही फरक पडणार नाही. अमेरिकेत ई-सिम असलेले आयफोन आधीच वापरात आहेत.
मात्र भारतातील परिस्थिती वेगळी आहे. फोनमधील फिजिकल सिम स्लॉटशी भारतीय वापरकर्ते जुळून गेले आहेत. प्रायमरी सिम, सेकंडरी सिम अशा पद्धतीने नेटवर्क बदलून वापरणे भारतीय वापरकर्त्यांची सवय आहे. अशा बाजारपेठेत केवळ ई-सिम असलेला आयफोन १७ एअर/स्लिम आल्यास वापरकर्त्यांसाठी हा एक नवीन अनुभव असेल.
ड्युअल सिम हे भारतीय स्मार्टफोन वापरकर्त्यांना हवे असलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अपल आयफोनमध्ये एका स्लॉटमध्ये फिजिकल सिम आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये ई-सिम देऊन हे शक्य केले आहे. मात्र फिजिकल सिम ट्रे नसलेला आयफोन भारतात आल्यास, येथील वापरकर्त्यांना त्याच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल, असे हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.