Investment Tips: SIP बंद न करता रक्कम कमी करण्याचे 'हे' आहेत सोपे मार्ग!
Investment Tips: अनेकजण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी SIP चा मार्ग निवडतात. पगार वाढल्यावर SIP ची रक्कम वाढवण्याचा सल्ला दिला जातो. पण समजा तुमचं उत्पन्न कमी झालं, तर SIP बंद न करता काय करता येईल, हे जाणून घेऊया.
15

Image Credit : Gemini AI
उत्पन्न कमी झाल्यास एसआयपी तात्काळ रद्द करण्याची गरज नाही.
आर्थिक परिस्थिती बदलल्यावर अनेक गुंतवणूकदार थेट आपली SIP बंद करतात. यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजाचा (Compounding) फायदा मिळत नाही. खरंतर, SIP बंद न करताही गुंतवणुकीची रक्कम कमी करण्याचे मार्ग आहेत. पण माहिती नसल्यामुळे अनेकजण आपलं नुकसान करून घेतात.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Gemini
SIP ची रक्कम कमी करण्याचे तीन मुख्य मार्ग
SIP गुंतवणुकीची रक्कम कमी करण्यासाठी तुमच्याकडे तीन मुख्य पर्याय आहेत. SIP तात्पुरती थांबवणे (Pause): अनेक म्युच्युअल फंड कंपन्या (AMCs) तुम्हाला SIP पूर्णपणे बंद न करता 1 ते 6 महिन्यांसाठी 'पॉज' करण्याची सुविधा देतात. आर्थिक स्थिती सुधारल्यावर तुम्ही पुन्हा SIP सुरू करू शकता. SIP रक्कम थेट कमी करणे: काही इन्व्हेस्टमेंट ॲप्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स तुम्हाला चालू SIP ची रक्कम थेट कमी करण्याची सोय देतात. उदाहरणार्थ, तुम्ही दरमहा ₹5,000 गुंतवत असाल, तर ती रक्कम ₹3,000 पर्यंत कमी करू शकता. जुनी SIP बंद करून नवीन सुरू करणे: ही सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. तुम्ही तुमची सध्याची SIP रद्द करून, गुंतवलेले पैसे तसेच ठेवून, कमी रकमेची नवीन SIP सुरू करू शकता.
35
Image Credit : Getty
प्रत्येक एएमसीनुसार नियम वेगवेगळे
SIP ची रक्कम कमी करण्याची प्रक्रिया प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीमध्ये (AMC) सारखी नसते. काही कंपन्या ॲपद्वारे बदल करण्याची सोय देतात, तर काही ठिकाणी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागतो किंवा नवीन नोंदणी करावी लागते. त्यामुळे, SIP मध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या AMC चे किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मचे नियम नक्की तपासा.
45
Image Credit : PR
सलग तीन ईएमआय चुकवले तर काय होते?
अनेक गुंतवणूकदारांना ही महत्त्वाची गोष्ट माहीत नसते की, सलग तीन SIP हप्ते भरले नाहीत, तर तुमची SIP आपोआप रद्द होऊ शकते. भारतातील जवळपास सर्वच AMC हा नियम लागू करतात. एकदा SIP रद्द झाल्यावर ती पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीत खंड पडतो आणि चक्रवाढ व्याजाच्या दीर्घकालीन फायद्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, हप्ते थांबवण्याऐवजी, SIP ची रक्कम कमी करणे किंवा तात्पुरती थांबवणे हे पर्याय निवडणे जास्त फायद्याचे आहे.
55
Image Credit : social media
एसआयपी सुरू ठेवणे का महत्त्वाचे आहे?
SIP हे दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. उत्पन्न तात्पुरते कमी झाले म्हणून गुंतवणूक पूर्णपणे थांबवण्याऐवजी, तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार SIP ची रक्कम कमी करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. कमी रकमेने का होईना, पण गुंतवणूक चालू ठेवल्यास तुम्ही बाजारातील संधी गमावत नाही आणि भविष्यात चांगला परतावा मिळवू शकता.

