- Home
- Utility News
- Digital Driving License जाणून घ्या डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्सचे फायदे, आणि ते कसे मिळवाल?
Digital Driving License जाणून घ्या डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्सचे फायदे, आणि ते कसे मिळवाल?
मुंबई - गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे, अन्यथा दंड भरावा लागतो. आता डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्सचा ट्रेंड वाढतोय. सर्वांकडे हे लायसन्स दिसून येत आहे. हे नेमके काय आहे? कसं मिळवायचं? फायदे काय आहेत? सर्व जाणून घ्या…
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड सोबत ठेवत नाही
गाडी चालवण्यासाठी भारतात ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. गाडी चालवताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर दंड भरावा लागतो. पण आता कोणीही हार्ड कॉपी किंवा आरटीओने दिलेलं ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड सोबत ठेवत नाही.
तुमच्या वेळेची बचत होते
डिजिटल इंडिया मध्ये, बहुतेक सर्व कामे डिजिटल पद्धतीने होत आहेत. त्याचे अनेक फायदेही आहेत. ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते सर्वजण डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यास पात्र आहेत. डिजिटल लायसन्स असेल तर तुमच्या वेळेची बचत होते.
डिजी लॉकर किंवा परिवहन अॅपद्वारे
डिजिटल लायसन्स कसं मिळवायचं? त्याची पद्धत काय आहे.. तर डिजिटल लायसन्स मिळवणं खूप सोपं आहे. डिजी लॉकर किंवा परिवहन अॅपद्वारे डिजिटल लायसन्स मिळवू शकता. त्यानंतर त्याचा उपयोग तुम्हाला कुठेही करता येणे सोपे आहे.
अॅप डाऊनलोड करून लॉग इन करा
मोबाईलमध्ये डिजी लॉकर अॅप डाऊनलोड करून लॉग इन करा. नंतर ट्रान्सपोर्ट हायवे विभाग निवडा आणि लायसन्स आयडी टाकून लायसन्स डाऊनलोड करा. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल लायन्सची कॉपी डाऊनलोड होईल. ती तुम्हाला कोणालाही दाखवता येईल.
आणखी एक वस्तू वाढत नाही
अधिकृत अॅपद्वारे डाऊनलोड केलेलं डिजिटल लायसन्स वैध असतं. हार्ड कॉपी सोबत ठेवावी लागत नाही. मोबाईलवरून डिजिटल लायसन्स दाखवलं तरी चालतं. त्यामुळे तुमच्या पर्समध्ये आणखी एक वस्तू वाढत नाही. तुम्ही मोबाईलमध्येच हे डिजिटल लायसन्स ठेवू शकता.