रात्री जास्त वेळ फोन वापरल्याने जागरण होते.  झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात आणि विशेषतः साखर व कार्बोहायड्रेट्स खाण्याची इच्छा वाढते. म्हणून चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

चाळीशीनंतर आरोग्याच्या बाबतीत अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि केस पांढरे होऊ लागतात, या सामान्य समस्या आहेत. त्यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा (उदा. चिकन, अंडी, कडधान्ये) समावेश करावा आणि संतुलित जेवण घ्यावे. दररोज किमान ८,००० पावले चालण्याने चरबी आणि तणाव कमी होतो. तसेच, छंद जोपासणे, डोळ्यांची नियमित तपासणी करणे आणि रात्री ८ तासांची शांत झोप घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती फॅट लॉस कोच निक कॉनवे यांनी माहिती दिली आहे.

एक

सकाळी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. निक यांच्या मते, दिवसाची सुरुवात सकाळी लवकर व्यायामाने करावी आणि ती रोजची सवय बनवावी. वजन उचलण्याचा व्यायाम असो किंवा जलद कार्डिओ सेशन, या दिनचर्येमुळे स्नायू तयार होण्यास, मेटाबॉलिझम वाढण्यास आणि ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. 

दोन

व्यायामानंतर लगेच जेवण करू नये, असेही निक सांगतात. दिवसभर संतुलित आहार घेण्याची सवय लावा, ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ उत्साही राहाल आणि पोट भरलेले राहील.

तीन

अभ्यासानुसार, छंद माणसाला निरोगी आणि दीर्घायुषी बनवतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगनुसार, विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणारे लोक अधिक निरोगी आणि आनंदी असतात.

चार

वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करा. नियमित अंतराने नेत्ररोग तज्ज्ञांना भेटा. डोळ्यांना कोणतीही समस्या नसली तरी तपासणी करावी. काचबिंदू (Glaucoma), मोतीबिंदू, आणि कॉम्प्युटर स्क्रीनवर जास्त वेळ पाहिल्यामुळे होणारा ड्राय आय (Dry Eye) यांसारख्या समस्या आहेत का, हे तपासता येते. 

पाच

स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि चयापचय क्रियेसाठी प्रथिने (प्रोटीन) खूप महत्त्वाची आहेत. आहारात चिकन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि कडधान्यांचा समावेश करा. दिवसभरात प्रोटीन्सचे समान प्रमाणात सेवन केल्याने स्नायूंची झीज रोखण्यास मदत होते.

सहा

एका व्यक्तीने दिवसातून किमान ८,००० पावले चालावे. यामुळे केवळ चरबी कमी होण्यास मदत होत नाही, तर तणाव कमी होऊन एकूण आरोग्यासाठीही फायदा होतो.

सात

रात्री जास्त वेळ फोन वापरल्याने सकाळी लवकर उठण्यास मदत होत नाही, असे निक यांनी सांगितले. झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात आणि विशेषतः साखर व कार्बोहायड्रेट्स खाण्याची इच्छा वाढते. झोप सुधारण्यासाठी वेळेवर झोपणे आणि उठणे हा एक उत्तम मार्ग आहे. दररोज आठ तास पूर्ण झोप घेत असल्याची खात्री करा.